Home /News /lifestyle /

हाडांचा चुरा की केमिकल नेमकं काय घालतात टूथपेस्टमध्ये? शंका दूर करण्यासाठी हे वाचाच

हाडांचा चुरा की केमिकल नेमकं काय घालतात टूथपेस्टमध्ये? शंका दूर करण्यासाठी हे वाचाच

टूथपेस्ट तयार करण्यासाठी हाडांचा चुरा वापरला जातो, हे खरं आहे का? काही वर्षांपूर्वी हा वाद इतका वाढला होता की, जपानमध्ये 2015 साली कोलगेटवर बंदी (Colgate banned in 2015 in Japan) घालण्यात आली.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : कितीतरी वर्षांपासून हा प्रश्न चर्चेमध्ये राहिलेला आहे. पण ठोस उत्तर कधीच समोर आलेली नाही. आपल्या दिवसाची सुरूवातच हातात ब्रश (Toothpaste) घेऊन होते. दात न घासता (Teeth Cleaning) खायलाही कुणालच आवडत नाही. दातांच्या काळजीसाठी (Dental Care) लोक दोन वेळा दात घासतात. पण, आपण दररोज सकाळी उठल्यानंतर दात घासण्यासाठी वापरणारी टुथपेस्ट नेमकी कशापासून केली जाते हा विचार सगळ्यांच्याच मनात येऊन गेला असेल. काही वर्षांपूर्वी टुथपेस्टमध्ये प्राण्यांच्या हाडांचा चुरा (Crush the Bones of Animals) मिसळला जात असल्याची बातमी समोर आलेली होती. तेव्हा, टूथपेस्ट तयार करण्यासाठी हाडांचा चुरा वापरला जात असल्याचा वाद इतका वाढला होता की, जपानमध्ये 2015 साली कोलगेटवर बंदी (Colgate banned in 2015 in Japan) घालण्यात आली. (सावधान! पावळ्यात डेंग्यूचा धोका वाढला; ही लक्षणं दिसल्यास त्वरित करा ‘हे’ उपाय) त्यानंतर लगेचच लोकांनी नैसर्गिक पदार्थांपासून केलेल्या पेस्ट वापरण्याची सुरुवात केली. पण, ही सवय जास्त काळ टिकू शकली नाही. कारण घराघरांमध्ये दात घासण्यासाठी टुथपेस्टच वापरली जाते. तसं पाहिलं तर नावं जरी बदलली तरी, प्रत्येक कंपनी एकच फॉर्मुला वापरत असते. काही दशकांआधी टुथपेस्टसाठी कोळसा, शिंपले , हाडांचा चुरा वापरला जात होता. मात्र अशा प्रकारचा वापर आता कालांतराने बंद झालेला आहे. (Baby Planning करताना या सवयी बदला; गर्भधारणेपासून आई होण्याचा प्रवास होईल सुखकर) दंततज्ज्ञांच्यामते दातांवरचे जंतू दूर करणाऱ्या टुथपेस्टमध्ये आता कॅल्शियम, कार्बोनेट आणि डिहाइड्रेटेड सिलिका जेल टाकलं जातं. याशिवाय फ्लोराईडही असतं. यामुळे दात लवकर तुटत नाही. दात मजबूत करण्यासाठी फ्लोराईड असलेली टुथपेस्ट वापरणं चांगलं असतं. टुथपेस्ट ओली रहावी ग्लिसेरॉल आणि प्रोप्रॅलिन वापरलं जातं. (हाडं मजबूत करतात हे 6 पदार्थ; संधिवात, फ्रॅक्चर, कॅन्सरची राहणार नाही भीती) शिवाय पेस्ट गोड करण्यासाठी काही स्विटनर्स वापरले जातात. टुथपेस्टमध्ये नैसर्गिक प्रमाणात सिंथेटिक सोल्युशन्स वापरलं जातं आणि फेस होण्यासाठी सोडियम लॉरेल सल्फेट घातलं जातं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या