नवी दिल्ली, 24 एप्रिल : फुफ्फुसं खराब झाल्यास शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळण्यास खूप त्रास होतो. फुफ्फुसं सुरक्षित राहणं किती महत्त्वाचे आहे, हे कोरोना विषाणूने आपल्या सर्वांना सांगितलं आहे. फुफ्फुसांच्या कार्यात बिघाड झाल्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, फुफ्फुसे (Lung health tips) शरीरातील अनेक कार्ये उत्तम प्रकारे चालवतात. आहार तज्ज्ञ काय म्हणतात झीन्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार आवश्यक आहे. अशाही काही गोष्टी आहेत, ज्यामुळे फुफ्फुसे कमकुवत होतात, त्यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. यामध्ये धुम्रपान आणि तंबाखू व्यतिरिक्त प्रक्रिया केलेले मांस, साखरयुक्त पेये आणि खूप मद्यपान यांचा समावेश आहे. या गोष्टी आहारात घेतल्यानं फुफ्फुसं लवकर खराब होऊ शकतात. फुफ्फुसासाठी हानिकारक गोष्टी साखरयुक्त पेये - आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की साखरयुक्त पेये फुफ्फुसासाठी हानिकारक आहेत, कारण यामुळे प्रौढांमध्ये ब्राँकायटिस होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत साखरयुक्त पेयांचे सेवन टाळावे. त्याऐवजी जमेल तेवढे पाणी प्या. प्रक्रिया केलेले मांस खाऊ नका - आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्रोसेस्ड मांस फुफ्फुसांसाठी अजिबात चांगले मानले जात नाही. कारण, ते टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये नायट्रेट नावाचा घटक वापरला जातो. ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये सूज आणि त्यावर ताण निर्माण होतो. त्यामुळे बेकन, हॅम, डेली मीट आणि सॉसेज इत्यादी प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळावे. जास्त दारू पिणे - आहार तज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्कोहोल फुफ्फुसासाठी हानिकारक आहे. त्यात असलेले सल्फाइट्स दम्याचे विकार वाढवू शकतात. अल्कोहोलमध्ये इथेनॉल देखील असते, जे फुफ्फुसांना नुकसान पोहोचवू शकते. अशा स्थितीत तुम्ही जास्त प्रमाणात मद्यपान टाळावे. हे वाचा - लांबसडक, सुंदर केसांसाठी जवसाच्या बिया वापरा; अनेक प्रॉब्लेम्सवर नेमका उपाय मर्यादेत दुग्धजन्य पदार्थ खा - दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले, तरी जेव्हा तुम्ही त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करण्यास सुरुवात करता तेव्हा ते फुफ्फुसासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांचे अधिक सेवन करू नये. हे वाचा - ‘या’ कुकिंग ऑइल्समुळे असते कॅन्सर होण्याची शक्यता; वेळीच व्हा सावध मीठ - मीठ आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते, परंतु मर्यादित प्रमाणात. जेव्हा कोणी जास्त प्रमाणात मीठ खातो तेव्हा त्याला फुफ्फुसाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळेच फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी मीठाचे सेवन कमी करा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यजू 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.