जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Flax seeds: लांबसडक, सुंदर केसांसाठी जवसाच्या बिया वापरा; केसांच्या अनेक प्रॉब्लेम्सवर नेमका उपाय

Flax seeds: लांबसडक, सुंदर केसांसाठी जवसाच्या बिया वापरा; केसांच्या अनेक प्रॉब्लेम्सवर नेमका उपाय

Flax seeds: लांबसडक, सुंदर केसांसाठी जवसाच्या बिया वापरा; केसांच्या अनेक प्रॉब्लेम्सवर नेमका उपाय

Flax seeds Benefits: फ्लेक्ससीड्सच्या वापराने केसांची वाढ सुधारते. यामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. जवसाच्या बिया आहारात घेतल्यानं केस रेशमी आणि मुलायम होतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 एप्रिल : जवस खाण्याच्या फायद्यांबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आरोग्यासाठी जवस खूप फायदेशीर आहे. जवसाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-बी, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स यांसारखे पोषक घटक आढळतात. ब्लड प्रेशर आणि वजन कमी करण्यास, कोलेस्टेरॉलवर नियंत्रणात ठेवण्यास आणि आरोग्याशी संबंधित इतर अनेक प्रॉब्लेम्सवर फायदेशीर आहेत. जवसाच्या बियांमध्ये असलेले हे पोषक घटक फक्त आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर आहेत. केसांसाठी जवसाच्या बियांचा नेमका कसा फायदा आहे, ते जाणूण (Flax seeds Benefits) घेऊया. केसांची चांगली वाढ फ्लेक्ससीड्सच्या वापराने केसांची वाढ सुधारते. यामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. जवसाच्या बिया आहारात घेतल्यानं केस रेशमी आणि मुलायम होतात. केसांना मजबूती आणि चमक मिळते जवसाच्या बियांमुळे केस निरोगी आणि सिल्की बनतात. या बियांमध्ये व्हिटॅमिन-बी देखील मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे केस मजबूत राहतात तसेच केसांचा कोरडेपणा कमी होतो. जवसामुळे केसांमध्ये आर्द्रता येण्यासही मदत होते. हे वाचा -  घरात आनंदी वातावरण, स्ट्रेस होतो कमी; बेडरूममध्ये ही इनडोअर प्लांट्स लावून पाहा डोक्याची त्वचा ड्राय - डोक्याची त्वचा ड्राय झाली असेल तर जवसाच्या बिया आहारात घेणं फायदेशीर ठरेल. त्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिडही भरपूर असते. केसांमध्ये जवसाच्या बिया वापरल्यानं केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि कोंडाही होत नाही. यासोबतच याच्या वापराने केसांची चमक वाढते आणि केस फुटण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळते. हे वाचा -  दीर्घायुष्य तुमची हाडे दणकट, मजबूत राहतील; आजपासूनच या चुकीच्या सवयी सोडा अशा प्रकारे वापरता येईल- हेअर मास्क बनवून तुम्ही केसांमध्ये जवसाच्या बिया वापरू शकता. यासाठी जवसाच्या बिया बारीक करून घ्या. नंतर त्यात दही, मध आणि लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट बनवा. त्यानंतर हेअर मास्कप्रमाणे केसांमध्ये लावा आणि 20 मिनिटांनी शॅम्पू करा. यासोबतच तुम्ही डोक्याच्या त्वचेवर आणि केसांना जवसाच्या तेलाने मसाज करू शकता. जर तुम्हाला फ्लॅक्ससीड तेल थेट केसांना लावायचे नसेल तर तुम्ही ते खोबरेल तेलात मिसळूनही वापरू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात