जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'या' कुकिंग ऑइल्समुळे असते कॅन्सर होण्याची शक्यता; वेळीच व्हा सावध

'या' कुकिंग ऑइल्समुळे असते कॅन्सर होण्याची शक्यता; वेळीच व्हा सावध

'या' कुकिंग ऑइल्समुळे असते कॅन्सर होण्याची शक्यता; वेळीच व्हा सावध

ऑलिव्ह ऑइल हे अशा प्रकारचं तेल आहे, की ज्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. एका संशोधनात असं आढळलं आहे, की ऑलिव्ह ऑइलमध्ये अल्डिहाइडचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे या तेलामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 22 एप्रिल : सध्याच्या धावपळीच्या काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी फारच बदलल्या आहेत. पौष्टिक अन्न खाण्यापेक्षा फास्ट फूड (Fast Food) खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु, आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेक अन्नपदार्थांबद्दल आपल्याला माहिती असतं, की या पदार्थांचा अतिरेक आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे असे पदार्थ खाणं टाळलं जातं. परंतु, काही पदार्थांविषयी आपल्याला पुरेशी माहिती नसते. रोजच्या स्वयंपाकात आपण कुकिंग ऑइल (Cooking Oil) म्हणजेच खाद्यतेलाचा वापर करतो. ही कुकिंग ऑइल्स वेगवेगळ्या प्रकारची असतात; मात्र, त्यातल्या काही प्रकारच्या ऑइल्समुळे आपल्याला इतर आजारांबरोबरच कॅन्सर होण्याचीदेखील शक्यता असते. अनेकदा आपल्याला पुरेशी माहिती नसल्यामुळे आपण ही कुकिंग ऑइल्स सर्रास वापरत असतो. कोणत्या कुकिंग ऑइल्समुळे कॅन्सरची (Cancer) शक्यता संभवते, याबद्दलची माहिती येथे देत आहोत. याबाबतची अधिक माहिती देणारं वृत्त ‘TV नाइन हिंदी’ने प्रसिद्ध केलं आहे. कॅन्सर होण्यामागे अनेक कारणं असतात. काही कुकिंग ऑइल्सही त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. मक्याचं तेल (Corn Oil), सूर्यफुलाचं तेल (Sunflower Oil), पाम तेल (Palm Oil) आणि सोयाबीनचं तेल (Soyabean Oil) गरम केल्यानंतर त्यांच्यामधून हानिकारक घटक बाहेर पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरची शक्यता असते. कुकिंग ऑइलमध्ये पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स (Polyunsaturated Fat) जास्त प्रमाणात असतात. तेल गरम केल्यानंतर त्यांचं विघटन अल्डिहाइडच्या (Aldehyde) स्वरूपात होतं. त्यामुळे तेल गरम केल्यानंतर त्याचा वास येतो. असं तेल आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. या तेलांचा अधिक प्रमाणात वापर केल्यामुळे आपल्या शरीरातली पीएच लेव्हल बिघडते. तसंच वजन वाढणं, कोलेस्टेरॉलची पातळी कमी-जास्त होणं, बद्धकोष्ठता, पचनास त्रास होणं यांसारख्या समस्या उद्धवतात. त्याचप्रमाणे याचा लिव्हरवरदेखील परिमाण होतो.

    Non Vegetarian | अंडं शाकाहारी की मांसाहारी? मिळालं शास्त्रशुद्ध उत्तर

    हल्ली सर्वांनाच चायनीज फूड, फास्ट फूड खाणं आवडतं; मात्र त्यासाठी अशा तेलांचा वापर केला जातो. तसंच बाहेरचे तळलेले पदार्थदेखील आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात. कारण हे पदार्थ तयार करण्यासाठी हे तेल वारंवार गरम केलं जातं. असं अनेकवेळा गरम केलेलं तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक असते. ऑलिव्ह ऑइल हे अशा प्रकारचं तेल आहे, की ज्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. एका संशोधनात असं आढळलं आहे, की ऑलिव्ह ऑइलमध्ये अल्डिहाइडचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे या तेलामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. कॅन्सर हा अतिशय गंभीर आजार आहे. त्यामुळे आपण वेळीच सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात आपल्या आहारात पौष्टिक पदार्थ अधिक असणं आणि एकंदरीतच आहार संतुलित असणं गरजेचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात