मुंबई, 16 जून : निरोगी केस आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चांगले केस कोणाच्याही नैसर्गिक सौंदर्यात चांगली भर घालतात आणि म्हणूनच आपण आपले केस चांगल्या स्थितीत आहेत की, नाही याची खात्री करण्यासाठी वेळ काढतो. अनेकांच्या बाबतीत असे घडते की, आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे आपण केसांकडे लक्ष देण्यास आणि केसांची काळजी घेऊ शकत नाही. यासोबतच आपण जो आहार घेतो त्याचाही आपल्या केसांच्या आरोग्यामध्ये मोठा वाटा असतो याकडेही आपण (Diet for healthy Hair) दुर्लक्ष करतो. पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा (Nutritionist Loveneet Batra) यांनी इन्स्टाग्रामवर नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये, लांब आणि निरोगी केसांसाठी एखाद्या व्यक्तीने आवश्यक नैसर्गिक स्त्रोतांबद्दल सांगितले आहे.
पोषणतज्ज्ञांनी शिफारस केलेले 5 नैसर्गिक घटक - मेथीचे दाणे - मेथीच्या बियांमध्ये (Fenugreek seeds) भरपूर लोह आणि प्रथिने असतात आणि त्यात फ्लेव्होनॉइड्स आणि सॅपोनिन्स सारख्या वनस्पती घटकांचे अद्वितीय मिश्रण असते, जे केसांच्या वाढीस उत्तेजन देतात. कढीपत्ता - कढीपत्ता (Curry leaves) कोणत्याही व्यक्तीला कोंडा आणि किरकोळ डोक्याच्या त्वचेच्या संसर्गाची समस्या बरी करण्यास मदत करू शकतो. कढीपत्ता अमीनो ऍसिडचा चांगला स्त्रोत आहे, केसांच्या वाढीस त्यामुळे मदत होते. जवस - जवसाच्या बियांचे (Flax seeds) सेवन केल्याने केसांची एकूण गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. या बिया फॅटी ऍसिडसने भरपूर असतात आणि त्यात अँटिऑक्सिडेंट असतात, जे मृत पेशी आणि टाळूतील प्रदूषक (pollutants) काढून टाकतात. जवस जेल अत्यंत हायड्रेटिंग आहे आणि केस फ्लफी होण्यास मदत करते. हे वाचा - Superfood For Women : वेगवेगळ्या वयोगटानुसार महिलांचा आहार कसा असावा? कोरफड व्हिटॅमिन ए, सी आणि ई समृद्ध कोरफड (Aloe vera) केसांना चमक आणते आणि निरोगी पेशींच्या वाढीस उत्तेजन देते. एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक अॅसिड देखील असते ज्यामुळे केस गळती थांबते. हे वाचा - जेवणाची भांडी, ताट-वाटीचाही आरोग्यावर होतो परिणाम; या गोष्टींकडे दुर्लक्ष नको आले - आले (Ginger) डोक्यातील कोंडा आणि खाज सुटण्यावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. आलं केसांसाठी सर्वोत्तम आहे कारण ते केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते, केस पातळ होण्यास प्रतिबंध करते आणि केस मुलायम आणि चमकदार बनवते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)