मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आरोग्याबरोबर चेहऱ्यासाठीही आहेत लवंग तेलाचे फायदे; या पद्धतीने वापरल्यास डाग, पुरळ, सुरकुत्या होतील कमी

आरोग्याबरोबर चेहऱ्यासाठीही आहेत लवंग तेलाचे फायदे; या पद्धतीने वापरल्यास डाग, पुरळ, सुरकुत्या होतील कमी

आयुर्वेदात लवंगाला औषध मानलं जातं. लवंग तेलाचा वापर सांधेदुखीत, दातदुखीत केला जातो.

आयुर्वेदात लवंगाला औषध मानलं जातं. लवंग तेलाचा वापर सांधेदुखीत, दातदुखीत केला जातो.

आयुर्वेदात लवंगाला औषध मानलं जातं. लवंग तेलाचा वापर सांधेदुखीत, दातदुखीत केला जातो.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : चेहऱ्यावरचे डाग (Blemishes on Face) घालवायचे असतील तर, मसल्यांमध्ये वापरण्यात येणारा एक पदार्थ उपयोगी आहे. लवंग (Clove) मसाल्यांमध्ये वापरला जाणारा असा पदार्थ आहे ज्यामुळे आरोग्याला भरपूर फायदे (Health Benefits) आहेत. आयुर्वेदात (Ayurveda) लवंगाला औषध (Medicine) मानलं जातं. लवंग तेलाचा वापर सांधेदुखीत, दातदुखीत केला जातो. लवंग खाल्ल्याने भूक वाढते. उलट्या होत असतील तर थांबवण्यासाठी लवंग खावेत. लवगं खाल्ल्याने पोटात गॅस तयार होत नाही. कफ आणि पित्तदोष दूर होतात. रक्ताचे विकार, श्वसनाचे त्रास, उचकी आणि क्षयरोगातही लवंगा वापरल्याने फायदा होतो. कही टुथपेस्टमध्ये लवंग हा प्रमुख घटक असतो कारण दातांचं दुखणं दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरतात. दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल (Clove Oil) घेऊन दाताला लावावं. आयुर्वेदात मधुमेहावर (Diabetes) लवंग लाभदायक असल्याचं सांगितलं आहे. रक्तातील साखरेचं (Blood Sugar) प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लवंग लाभदायी ठरते. त्वचेसाठीही लवंग (Skin For Clove) वारल्यास फायदा होतो. त्वचारोग तज्ज्ञांच्यामते लवंग तेल बॅक्टेरियाची वाढ रोखतं. वाढत्या वयाची लक्षणं त्वचेवर दिसत असतील तर, ती रोखण्यातं लवंग तेल फायदेशीर आहे. (कहर कपल! नोकरी सोडून दोन वर्षं हनीमून करत फिरले; किती लाख उधळले वाचून व्हाल थक्क) आपलं बदलेलं लाईफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावरही परिणाम होतो. चेहऱ्यावर डाग येतात किंवा पिंपल्समुळे चेहरा खराब दिसायला लागतो. त्यावर लवंगेचा उपाय करू शकता. लवंग तेलाने पिंपल्स कमी होतात. चेहऱ्यावरचं पुरळ कायमचं घालवण्यासाठी लवंग तेल वापरता य़ेतं. या तेलाने चेहऱ्यावरचे डाग निघून जातात. (हाडांचा चुरा की केमिकल नेमकं काय घालतात टूथपेस्टमध्ये? शंका दूर करण्यासाठी वाचाच) पण, हे तेल थेट चेहऱ्यावर लाऊ नये. त्याऐवजी बादाम किंवा नारळ तेलात घालून वापरावं. हे तेलं तीव्र असतं त्यामुळे चेहऱ्यावर लावताना 1 ते 2 थेंबच वापारवेत. सुरकुत्या कमी करण्यासाठी 2 थेंब लवंग तेल आणि 5 थेंब नारळाचं तेल एकत्र करा. या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. काहीच दिवसात परिणाम दिसायला लागेल. (केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे माहिती झाले तर, ताटात जेवणं बंद कराल) चेहरा नॅचरली ग्लो करेल. हे तेल धुळ, माती आणि प्रदुषणाच्या त्रासापासून वाचवून चेहरा सुंदर आणि तजेलदार करतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Skin care

    पुढील बातम्या