मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

PHOTO - डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला

PHOTO - डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला

डिस्काऊंट किमतीत तिने परदेशात दातांवर उपचार करून घेतले पण त्याचा फायनल रिझल्ट पाहून तिला धक्काच बसला

डिस्काऊंट किमतीत तिने परदेशात दातांवर उपचार करून घेतले पण त्याचा फायनल रिझल्ट पाहून तिला धक्काच बसला

डिस्काऊंट किमतीत तिने परदेशात दातांवर उपचार करून घेतले पण त्याचा फायनल रिझल्ट पाहून तिला धक्काच बसला

    तेहरान, 30 मे : ऑफर, डिस्काऊंट म्हटलं की ग्राहक त्याकडे आकर्षित होतात. जिथं डिस्काऊंट असेल तिथं ग्राहक पळतात. एका महिला तर अशाच डिस्काऊंटच्या नादात चक्क परदेशात गेली. डिस्काऊंट मिळतो आहे म्हणून तिने आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन दातांवर उपचार करून घेतले. पण जेव्हा तिने तोंड उघडलं तेव्हा या उपचाराचा फायनल रिझल्ट पाहून तिला धक्काच बसला (Woman went another country for teeth treatment in discount). आपल्याला फायद्याच्या वाटणाऱ्या डिस्काऊंटचा फटका बऱ्यादा ग्राहकांनाच बसतो. असंच एका महिलेच्या बाबतीत घडलं आहे. ऐडा एजीजी असं या महिलेचं नाव आहे. 26 वर्षांची ऐडाला दातांवर उपचार घ्यायचे होते. त्यावेळी तिला इराणमध्ये यासाठी डिस्काऊंट मिळत असल्याचं समजलं. आपल्या देशाच्या तुलनेत तिथं आपल्याला कमी किमतीत उपचार करून मिळतील म्हणून तिनं तिथं जायचं ठरवलं. तेहरानमध्ये जाऊन तिने आपल्या दातांची ट्रिटमेंट केली. हे वाचा - Diabetes Symptoms: अशा 5 प्रकारे Body Pain होत असतील तर सावधान! हाय ब्लड शुगरचे असू शकतात ते संकेत तब्बल 6 तास तिच्या दातांची ट्रिटमेंट करण्यात आली.  पण त्यानंतर तिचे दात पिआनोसारखे दिसू लागले. तिचे नवे दात जुन्या दातांपेक्षा खूप वेगळे आहेत. तिला आपलं तोंडही बंद करता येत नाही आहे. यामुळे तिचं हसणं बदललं, तिचा आवाजही बदलला. तिने आपल्या दातांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. टिकटॉकवर तिने व्हिडीओही पोस्ट केला आहे. ऐडाने सांगितलं, ऑपरेशन सुरू झाल्यानंतर तिचा डेंटिस्ट दुसऱ्या रुग्णासोबत बिझी होता. ज्यामुळे त्याच्या सहाय्यकाने तिच्यावर उपचार केले. डेंटिस्टचं काम पाहून तो एक अनुभवी डॉक्टर आहे, असं वाटलंच नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Viral

    पुढील बातम्या