मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Blood Pressure वाढल्यावर घाबरू नका; 5 ज्यूस नियंत्रणात ठेवतील तुमचा रक्तदाब

Blood Pressure वाढल्यावर घाबरू नका; 5 ज्यूस नियंत्रणात ठेवतील तुमचा रक्तदाब

जेवणानंतर फळं खाल्ल्यास त्याचा चुकीचा परिणाम शरीरावरती होतो. फळ चावून खवीत त्यातील फायबर्सने पोट चांगलं राहतं. त्यामुळे आरोग्याला लाभ मिळतात मात्र, फळांचा रस प्यायला आवडत असेल तर, त्यामध्ये साखरेचा वापर करू नये.

जेवणानंतर फळं खाल्ल्यास त्याचा चुकीचा परिणाम शरीरावरती होतो. फळ चावून खवीत त्यातील फायबर्सने पोट चांगलं राहतं. त्यामुळे आरोग्याला लाभ मिळतात मात्र, फळांचा रस प्यायला आवडत असेल तर, त्यामध्ये साखरेचा वापर करू नये.

ब्लड प्रेशर (blood pressure) नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारही महत्त्वाचा आहे.

दिल्ली, 29 एप्रिल : ब्लड प्रेशर (Blood Pressure) किंवा उच्च रक्तदाब शरीरासाठी हानिकारक असतं. ब्लड प्रेशर (Blood Pressure) वाढण्याला हायपर टेन्शनही (Hypertension) म्हणतात. हाय ब्लडप्रेशरमध्ये धमन्यांमधला रक्तप्रवाह वेगात व्हायला सुरुवात होते. हाय ब्लडप्रेशरची कोणतीही लक्षणं नसतात त्यामुळेच ब्लड प्रेशरला सायलेंट किलर म्हटलं जातं. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधं घ्यावी लागतात आणि आहारात बदल करावा लागतो.

जेवणात काही पदार्थांचा समावेश केल्याने हाय ब्लड प्रेशरवर कंट्रोल करता येतं. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर,या ड्रिंकचा (Drink) फायदा नक्कीच होऊ शकतो.

 टोमॅटो ज्यूस

दररोज एक ग्लास टोमॅटो रस हृदय निरोगी ठेवतं. टोमॅटो ज्युसने स्टेज वन हायपर टेन्शन आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलदेखील नियंत्रणात राहतं. हायपर टेन्शनचा त्रास असणाऱ्यांनी टॉमेटो ज्युसमध्ये मीठ घालून पिणं टाळावं.

(PNB च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ALERT! या कॉल्समुळे होऊ शकतं तुमचं खातं रिकामं)

बीट ज्यूस

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी बीटचा ज्यूस प्यावा. ब्लडप्रेशरचा त्रास होत असेल तर बिटाचा ज्यूस प्यावा. बीटमध्ये डायटरी नायट्रेट असतं, असं 2017च्या एका हवालानुसार स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हायब्लडप्रेशर असणाऱ्यांनी बीट ज्यूस प्यावं.

डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड असतं. यात अँटी इम्फ्लेमेट्री गुण असतात, त्यामुळे हृदय हेल्दी राहतं. यात असणारं सिस्‍टोलिक आणि डायसिस्‍टोलिक ब्लड प्रेशरसाठी चांगलं असतं. मार्केटमधून डाळिंबाचा ज्यूस खरेदी करताना तो शुगर फ्री असल्याची खात्री करावी. कोणताही ज्यूस नैसर्गिक असल्यास जास्त फायदा होतो.

(Bank Privatisation चा ग्राहकांना काय फायदा होणार? RBI ने आखली महत्त्वाची योजना)

स्किम मिल्क

स्किम मिल्क आणि दह्यासारखे कमी चरबीयुक्त डेअरी पदार्थ हायपर टेन्शन कमी करण्यात खूप उपयुक्त आहेत. आयुर्वेदाबरोबरच सायन्सने देखील हे मान्य केलं आहे. 2011 मध्ये 45,000 लोकांवर या संदर्भात संशोधन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये कमी चरबी आणि उच्च चरबीयुक्त दुग्ध उत्पादनांच्या परिणामांचं परीक्षण केलं गेलं. त्यानुसार कमी चरबीयुक्त दूग्धजन्य पदार्थ रक्तदाब नियंत्रित करण्यात उपयुक्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. .

(कोरोना काळात बँकेत जावं लागणार नाही, या बँकांच्या विविध सुविधा मिळतील ATM मध्येच)

काळी मिरी

आयुर्वेदानुसार ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे. काळी मिरी पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून प्यायल्याने फायदा मिळतो.

First published:

Tags: Health, Health Tips