मुंबई 13 ऑगस्ट : चहा हे भारतीयांचं आवडतं पेय आहे. लोक आपल्या दिवसाची सुरुवात देखील चहाने करतात. असे अनेक लोक आहेत. ज्यांना वेळेवर चहा लागतो आणि जर का त्यांचा चहाची वेळ चुकली तर त्यांचा दिवस फारच खराब जातो. असे देखील अनेक लोक आहेत, ज्यांना कडक चहा प्यायला आवडतो. हिवाळ्यात तर चादरीत बसून चहा पिण्याची मजा काही औरच असते. पण, हा दुधाचा चहा आरोग्यासाठी चांगला आहे का? दुधाचा चहा चांगला का वाईट यावरून अनेकदा वाद होतात. पण याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात? चला तर मग जाणून घेऊया दुधाच्या चहाचे आरोग्यदायी फायदे आणि नुकसान. आधी आपण दुधाच्या चहाच्या फायद्यांबद्दल बोलूयात. हे ही वाचा : तुम्ही देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? मग डाएटमध्ये नक्की करा ‘या’ पदार्थांचा समावेश हे फायदे शरीराला मिळतात हा चहा प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते यात शंका नाही कारण चहा प्यायल्यानंतरच त्यांना कोणतेही काम करण्यासाठी शरीरात ऊर्जा जाणवते. डोकेदुखी दूर करण्यासाठी आलं घातलेला दुधाचा चहा चांगला प्रभाव दाखवतो. कारण आलं वेदना कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. दुधाच्या चहाला मूड लिफ्टर देखील म्हटले जाऊ शकते. यामुळे मूड पूर्वीपेक्षा चांगला होऊ शकतो. तणाव कमी करण्यासाठी दुधाच्या चहाचे फायदे देखील दिसून आले आहेत. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करणारी माणसे वेळोवेळी चहा पित असतात. हे ही वाचा : पण गाय की म्हैस कोणतं तुप जास्त फायद्याचं? जाणून घ्या माहिती हे नुकसान शरीराला होतात - प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तसेच दुधाच्या चहाच्या फायद्यासोबत त्याचे तोटे देखील आहे. - सकाळी लवकर रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी होऊ शकते. - दुधाच्या चहाचे सर्वाधिक सेवन केल्याने झोपेची समस्या उद्भवू शकते. -या चहाच्या अतिसेवनाने शरीरातील उरलेल्या पोषक तत्वांमध्ये व्यत्यय येतो. शरीराला इतर घटक शोषून घेणे कठीण जाते. - चहामुळे छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे पोट फुगणे आणि मळमळ देखील कधीकधी जाणवते. (विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.