मुंबई 13 ऑक्टोबर : बदलत्या जीवशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या ही सर्वच वयोगटांतील व्यक्तींसाठी अतिशय चिंतेची बाब ठरत आहे. लठ्ठपणामुळे इतरही आजारांना निमंत्रण मिळतं. म्हणून आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट प्लॅन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर व्यायामाबरोबर प्रोटिनयुक्त डाएट हे सर्वांत चांगलं कॉम्बिनेशन आहे. बरेच जण साधे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाणं टाळतात, कारण ते भूक चांगल्याप्रकारे भागवत नाहीत. मात्र, यामुळे उलट जास्त भूक लागू शकते. प्रोटिनमुळे भूक शमल्याची भावना वाढते, पचनक्रिया कमी वेगाने होते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.
प्रोटिनयुक्त स्नॅक्स तुमची भूक भागवण्याचं काम करतात. शिवाय, वजन वाढण्यास कारणीभूत ठरणारं अन्न टाळण्यासदेखील मदत करतात. या ठिकाणी काही प्रोटिनयुक्त स्नॅक्सची माहिती देण्यात आली आहे. ज्यांचा तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करू शकता.
पिस्ता
पिस्ता हे असं स्नॅक आहे ज्यामध्ये फायबर, गुड फॅट्स आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन असतं. पिस्ते खाल्ल्याने तुमचं पोट लवकर भरतं. त्यामुळे जास्त अन्न खाण्याची गरज पडत नाही. परिणामी, वजन कमी होण्यासही मदत होते.
उकडलेली अंडी
अंडी हा प्रोटिनचा सर्वांत लोकप्रिय स्रोत आहे. ज्या व्यक्ती जिममध्ये जातात त्या त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करतात. उकडलेली अंडी ही प्रोटिन आणि इतर पौष्टिक घटकांचा उत्तम स्रोत असतात. जिममध्ये व्यायाम केल्यानंतर अंड्यातील घटक एकत्रितपणे वजन कमी करण्यास आणि स्नायुंच्या रिकव्हरीसाठी मदत करतात.
प्रोटिन बार
प्रोटिन बार हे एक विलक्षण प्रोटिन स्नॅक आहे. यामुळे लवकर पोट भरतं. शिवाय चॉकलेट्स आणि कँडीजसारखे साखरयुक्त पदार्थ खाण्याची तुमची इच्छाही पूर्ण होते. प्रत्येक प्रोटिन बारमध्ये किमान 15-20 ग्रॅम प्रोटिन्स असतात. प्रोटिन बार हे स्नायूंचं वजन राखून चरबी कमी करण्यास मदत करतात.
पनीर
शाकाहारी व्यक्तींना पनीर किंवा कॉटेज चीज हे प्रोटिनयुक्त पदार्थ आवडतात. मांस आणि अंडी यांना पर्याय म्हणून पनीरचा वापर होतो. साइड डिश, स्टार्टर किंवा जेव्हाही तुम्हाला भूक लागेल तेव्हा स्नॅक म्हणून पनीरचा वापर केला जाऊ शकतो. एक कप पनीरमध्ये (240 ग्रॅम) सुमारे 25 ग्रॅम प्रोटिन्स असतात. शिवाय, त्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण नगण्य असतं त्यामुळे फिटनेस फ्रीक्ससाठी हे एक उत्तम स्नॅक आहे.
ग्रीक योगर्ट
एका कप ग्रीक योगर्टमध्ये (224 ग्रॅम), 20 ग्रॅम प्रोटिन असतं. एक कप साध्या योगर्टच्या तुलनेत ग्रीक योगर्टमधील प्रोटिनचं प्रमाण जास्त असतं. एक कप ग्रीक योगर्टमध्ये प्रतिऔंस चार ग्रॅम प्रोटिन वाढवण्यासाठी तुम्ही त्यात ग्रॅनोला टाकू शकता. ग्रीक योगर्टमध्ये कॅल्शियमचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी त्याचा फायदा होतो.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर वरील पदार्थ तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Marathi news, Weight loss