मुंबई 12 ऑक्टोबर : जेवणात तूप मिसळल्याने जेवणाला खूप चांगली चव येते. एवढेच नाही तर ते आरोग्यासाठी देखील चांगले असल्याचे म्हटले जाते. तसेच आपल्या आहारातील अनेक पोषक तत्वांची कमतरता तूप पूर्ण करते. खरंतर आयुर्वेदात देखील तुपाकडे औषध म्हणून पाहिले जाते. हे सौंदर्यासाठी देखील चांगले मानले जाते. यामुळे त्वचेची चमक वाढवते. असं देखील म्हणतात.
परंतू लोकांमध्ये एक संभ्रम नेहमीच असतो की गाईचं की म्हशीचं.... कोणतं तुप चांगलं आहे? चला याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात पाहू.
दोन तुपात काय फरक आहे?
गाईचे तूप म्हशीपेक्षा रंगाने थोडे जास्त पिवळे असते. तर म्हशीचे तुप हे कमी पिवळे असते
हे ही वाचा : मासिक पाळीच्या प्रत्येक समस्येपासून मिळेल आराम; त्या दिवसात करा 'हा' व्यायाम
https://lokmat.news18.com/heatlh/benefits-of-exercise-during-periods-tips-for-exercise-during-periods-mhpj-771767.html
पचनासाठी कोणते चांगले आहे?
जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला पचनाशी संबंधित समस्या येत असतील तर त्यांच्यासाठी गाईचे तूप चांगले मानले जाते कारण म्हशीचे तूप पचायला थोडे जड असते. गाईच्या तुपात विद्राव्य आम्ल असते, त्यामुळे ते लहान मुले आणि वृद्धांसाठी अधिक फायदेशीर ठरते.
गाईच्या तुपामध्ये म्हशीच्या तुपापेक्षा खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि प्रथिनेंसोबतच अधिक पोषक तत्त्वे आढळतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांबद्दल बोलायचे झाले तर ते गाय आणि म्हैस या दोन्हींच्या तुपात पुरेशा प्रमाणात आढळते.
परंतू जर तुमच्या शरीरात फॉस्फरस आणि मॅग्नेशियमची कमतरता असेल, तर त्यासाठी म्हशीचे तूप केव्हा ही चांगले.
हे ही वाचा : बाथरूममध्ये असताना व्यक्तीच्या डोक्यात जास्त क्रिएटिव्ह विचार का येतात? जाणून घ्या काय म्हणतात शास्त्रज्ञ
https://lokmat.news18.com/lifestyle/why-creative-ideas-came-in-brain-when-a-person-is-in-bathroom-scientist-answer-the-question-mhnk-gh-772580.html
वजन राखण्यासाठी कोण चांगले आहे?
-जर तुम्हाला वजन संतूलित राखायचे असेल, तर गायीचे तूप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल, तर म्हशीचे तूप तुमच्यासाठी चांगले आहे, पण तूप खाताना हे लक्षात ठेवा की ठराविक प्रमाणातच ते वापरावे. जास्त प्रमाणात तूप तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
-म्हशीच्या तुपात चरबी जास्त प्रमाणात आढळते आणि जे जास्त शारीरिक श्रम करतात त्यांच्यासाठी चांगले मानले जाते.
-शेल्फ लाइफ म्हशीच्या तुपात जास्त प्रमाणात आढळते. त्याच वेळी, शेल्फ लाइफ गायीच्या तुपात कमी प्रमाणात आढळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ghee, Health, Health Tips, Lifestyle