मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

झोपेत बोलण्याच्या, चालण्याच्या समस्याही होतात ठीक; डॉक्टर कसा करतात उपचार? 

झोपेत बोलण्याच्या, चालण्याच्या समस्याही होतात ठीक; डॉक्टर कसा करतात उपचार? 

`तणाव, चिंता, भीती आणि डिप्रेशनमुळे वेगवेगळे स्लीप डिसॉर्डर होतात. याशिवाय ज्या लोकांना पोस्ट ट्राउमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर अर्थात पीटीएसडी (PTSD) आहे, त्यांच्यातही झोपेत चालणं किंवा बोलण्याची लक्षणं दिसतात.

`तणाव, चिंता, भीती आणि डिप्रेशनमुळे वेगवेगळे स्लीप डिसॉर्डर होतात. याशिवाय ज्या लोकांना पोस्ट ट्राउमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर अर्थात पीटीएसडी (PTSD) आहे, त्यांच्यातही झोपेत चालणं किंवा बोलण्याची लक्षणं दिसतात.

`तणाव, चिंता, भीती आणि डिप्रेशनमुळे वेगवेगळे स्लीप डिसॉर्डर होतात. याशिवाय ज्या लोकांना पोस्ट ट्राउमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर अर्थात पीटीएसडी (PTSD) आहे, त्यांच्यातही झोपेत चालणं किंवा बोलण्याची लक्षणं दिसतात.

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : उत्तम आरोग्यासाठी (Health) रात्रीच्यावेळी शांत झोप (Sleep) घेणं गरजेचं आहे. झोप चांगली लागत असेल तर शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होत नाहीत तसंच मेंदूचं कार्यही सुरळीत चालतं. लहान मुलं किंवा ज्येष्ठ व्यक्तींना प्रामुख्याने झोपेच्या समस्या जाणवतात. लहान मुलं आणि ज्येष्ठ व्यक्तींना झोपेत बोलण्याची (Talking), ओरडण्याची, चालण्याची (Walking) किंवा खाण्याची (Eating) सवय असते. काही व्यक्तींना रात्री शांत झोप येत नाही. त्यामुळे जागरणाची सवय लागते. तसंच काही व्यक्तींना झोपेतून अचानक जागं होण्याची समस्या असते. यामुळे झोपेचं तंत्र बिघडतं. अर्धवट झोपेतून जागं झाल्यानंतर पुन्हा शांत झोप लागत नाही. त्यातही झोपेत ओरडण्याची आणि बोलण्याची सवय असलेल्या लहान मुलांना आणि ज्येष्ठ व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. या समस्येला विशिष्ट प्रकारची औषधं (Medicine) किंवा आजार (Disease) कारणीभूत असतात. या आजारांवर निश्चितपणे उपचार शक्य आहेत. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे. झोपेशी संबंधित अनेक समस्या असतात. त्यापैकी झोपेत बोलणं, ओरडणं किंवा चालणं या समस्या काहीशा त्रासदायक असतात. लहान मुलं किंवा ज्येष्ठ व्यक्तींमध्ये या समस्यांचं प्रमाण तुलनेने जास्त असल्याचं दिसून येतं. अशा समस्या असलेल्या व्यक्तीचा कुटुंबातल्या सदस्यांना काही वेळा त्रास होतो, त्यामुळे घरात या व्यक्तींची झोपण्यासाठी वेगळी सोय केली जाते. सोशल लाइफमध्येही या लोकांना अडचणी येतात. काही औषधं किंवा पार्किसन्ससारख्या आजारांमुळे, आरोग्यविषयक अन्य समस्यांमुळे झोपेत बोलणं, ओरडणं किंवा चालण्याची समस्या निर्माण होते. तज्ज्ञांच्या मते, अनियमित झोपेची समस्या ही मानसिक आरोग्याशी (Psychological Health) निगडित असते. मानसोपचारतज्ज्ञदेखील यावर उपचार करतात. परंतु, आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात स्लीप स्पेशलिस्टचा (Sleep Specialist) देखील बोलबाला आहे. ``झोपेत चालणं किंवा खाणं ही समस्या असलेल्या लोकांना पॅरासोम्निया (Parasomnia) हा आजार असण्याची शक्यता असते. ही एक वर्तणुकीशी निगडीत झोपेची विकृती आहे. त्यामुळे ही समस्या आपल्याला खरोखर जाणवतेय, यावर लोक सहसा विश्वास ठेवत नाहीत. कारण झोपेत केलेलं असामान्य वर्तन त्यांना जागं झाल्यावर आठवत नाही. अनेक वेळा या गोष्टीची जाणीव करुन दिल्यानंतरच ते ही समस्या स्वीकारतात. पॅरासोम्नियावर औषधं तसंच थेरपीच्या मदतीनं उपचार केले जातात. या समस्येवर उपचार करताना कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी, सायकोथेरपी, रिलॅक्सेशन थेरपी, हिप्नॉसिस थेरपीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तीला जीवनशैलीत आणि झोपेच्या सवयीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो,`` अशी माहिती मध्य प्रदेशातील भोपाळ येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सत्यकांत त्रिवेदी यांनी दिली. ResMed येथे आशिया आणि लॅटिन अमेरिकेसाठी वैद्यकीय व्यवहार प्रमुख डॉ. शुभाशीष डे म्हणाले, ``स्लीप एप्निया ही एक गंभीर आणि जीवघेणी समस्या आहे. स्लीप एप्निया हा कमी अधिक प्रमाणात सर्व वयोगटातील किंवा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. पण पुरुषांमध्ये ही समस्या खूपच सर्वसामान्य आहे. मूलभूतपणे, स्लीप एप्निया हा एक श्वासोच्छवासाचा विकार आहे, जो झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यात काहीसा अडथळा निर्माण करतो. स्लीप एप्नियामुळे बऱ्याचदा पॅरासोम्नियाची समस्या निर्माण होते. झोपेत वारंवार व्यत्यय आल्यामुळे झोपेशी संबंधित अनेक प्रकारचे विकार होतात. पॅरासोम्नियावर उपचार करताना स्लीप स्पेशलिस्ट सर्वप्रथम संबंधित रुग्णाच्या झोपेच्या सवयी जाणून घेतात. तसेच अन्य आजार आणि कोणती औषधं सुरु आहेत, याची माहिती घेतात. तसेच कुटुंबातल्या ज्या व्यक्ती रुग्णाशेजारी झोपतात, त्यांच्याशी देखील स्पेशलिस्ट संवाद साधतात. याशिवाय या आजाराचं निदान पॉलीसम्नोग्राम टेस्टच्या (Polysomnogram Test) माध्यमातूनही केलं जातं.`` ``तणाव, चिंता, भीती आणि डिप्रेशनमुळे वेगवेगळे स्लीप डिसॉर्डर होतात. याशिवाय ज्या लोकांना पोस्ट ट्राउमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर अर्थात पीटीएसडी (PTSD) आहे, त्यांच्यातही झोपेत चालणं किंवा बोलण्याची लक्षणं दिसतात. काही औषधांच्या वापरामुळे अनिद्रेची समस्या निर्माण होते. यामुळे कायम झोप अपुरी होते आणि मन बेचैन राहतं. ज्या लोकांना पार्किसन्स आहे, त्यांच्यातही पॅरासोम्नियाची लक्षणं दिसतात, ``अशी माहिती सर गंगाराम रुग्णालयाचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजीव मेहता यांनी दिली. त्यामुळे झोपेत चालणं, ओरडणं, बोलणं आणि खाणं यापैकी कोणतीही समस्या जाणवत असेल तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.
First published:

Tags: Health, Health Tips, Sleep, Sleep benefits

पुढील बातम्या