नवी दिल्ली, 28 एप्रिल : सध्या कोरोनाच्या कठीण (corona pandemic) संकटामुळे लॉकडाउन पुन्हा एकदा सुरू झाला आहे. परत लहानांपासून मोठ्यांपर्यत पुन्हा एकदा सगळे घरातच अडकून पडले आहेत. लहान मुलांची तर कित्येक दिवसांपासून शाळेशी गाठभेट नाही, त्यामुळे मुलं एका वेगळ्याचं चक्रातून सध्या जात आहेत. याशिवाय लॉकडाउनमुळे घरातच रहाव लागल्याने मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावरही (mental health) याचा परिणाम होत आहे. सायंन्स डेलीच्या वृत्तानुसार ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ चाइल्ड अँड अडोलेसेंट सायक्रिएट्री’ (JAACAP) मध्ये झालेल्या संशोधनात एक रिपोर्ट तयार करण्यात आला आहे, त्यात 4 ते 21 या वयोगटातील मुलांवर संशोधन करण्यात आलं आणि कोरोनाकाळात त्यांच्यावर नक्की काय परिणाम झाला (Kids Mental Health During Corona Period) यावर अभ्यास करण्यात आला.
शोध काय सांगतो -
सायक्रिएटिक टाइम्सच्या वृत्तानुसार शाळा बंद असणं आणि आपल्या वयाच्या मुलांशी संपर्क नसणं, तसंच त्यांच्याशी खेळायला न मिळणे यामुळे मुलांमध्ये एकटेपणा वाढला आहे. ज्यामुळे त्यांच्यात डिप्रेशन सारखे आजार वाढत आहेत. याचा परिणाम मुलांच्या मानसिक तसंच शारिरीक स्वास्थ्यावरही होतो. यामुळे पालकांनी मुलांच्या या मानसिकतेवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. या सध्याच्या काळात आपल्या पाल्याची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपायांचा नक्की उपयोग करा.
(वाचा - घरातील आरशावर डाग आहेत? करा हे घरगुती उपाय)
मित्रांशी संपर्क ठेवण्यास मदत करा -
कोरोनाच्या या काळात सामाजिक अंतर राखणं फार गरजेचं आहे. पण तरीही मुलांना त्यांच्या मित्रमैत्रिणींशी संपर्कात ठेवण गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही व्हिडीओ कॉलिंगचा उपयोग करु शकता. यामुळे मुलांचा तणाव कमी होऊन त्यांच मन रमेल.
छंद जोपासण्यास मदत करा -
सध्या शाळा बंद आहेत त्यामुळे घरी मुलांचा वेळ वाया न घालवता त्यांना छंद जोपासण्यास मदत करा. गार्डनिंग, पेटींग, कुकिंग, सिंगिंग अशा वेगवेगळ्या गोष्टीत त्यांना व्यस्त ठेवा.
ऑनलाइन क्लासेससाठी मदत करा -
ऑनलाइन क्लास ही आता मुलांसाठी नवी गोष्ट नसली तरीही अनेकदा त्यांना काही गोष्टी समजत नाहीत, तेव्हा त्यांना समजावून सांगा. अभ्यासात मन लगात नसेल, तर हसून खेळून त्यांच्यात रस निर्माण करा.
मुलांचा ताणतणाव दूर करा -
मुलं आणि पालक सध्या घरीच आहेत. त्यामुळे मुलांना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं त्यांना देण्याचा प्रयत्न करा. त्यांच मन हलकं करा.
मुलांना कोरोनाविषयी द्या माहिती -
मुलांना कोरोना व्हायरची माहिती दया. स्वत:ची काळजी कशी घ्यायची. हात कसे स्वच्छ करायचे. कोणत्या गोष्टींपासून दूर रहायचे हे शिकवा. मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Mental health, Parents and child