Home /News /lifestyle /

घरातील आरशावर डाग आहेत? करा हे घरगुती उपाय

घरातील आरशावर डाग आहेत? करा हे घरगुती उपाय

आरसा हा नेहमी स्वच्छ आणि चकचकीत असणं गरजेचं असतं. पण बऱ्यातदा काळजी घेऊनही आरशावर धूळ किंवा डाग (dirt on mirror) दिसतात. त्यासाठी काही उपाय (mirror cleaning tips) नक्की करुन पहा.

  मुंबई, 26 एप्रिल : प्रत्येक घरात आरसा (mirror) हा अतिशय महत्त्वाचा, अविभाज्य घटक असतो. दिवसभरात नकळत प्रत्येक जण असंख्य वेळा आरशासमोरून जात स्वत:ला पाहून खूश होतो. पण याच आरशात स्वत:ला पाहताना त्यावर डाग दिसले की मात्र सांप होतो. त्यामुळे आरसा हा नेहमी स्वच्छ आणि चकचकीत असणं गरजेचं असतं. पण बऱ्यातदा काळजी घेऊनही आरशावर धूळ किंवा डाग (dirt on mirror)  दिसतात. त्यासाठी काही उपाय  (mirror cleaning tips) नक्की करुन पहा. मीठ (salt) - मीठ जसं जेवण रुचकर करत, तसंच ते आरशालाही चकचकीत करू शकतं. त्यासाठी पाण्यात एक चमचा मीठ मिसळून त्या पाण्याने आरसा स्वच्छ करा. आरसा चमकेल.

  (हे वाचा - फक्त एका क्लिकवर तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर पोहोचा; Google Maps आहे मदतीला)

  लिंबू रस (Lemon juice) - लिंबाच्या रसाचाही आरसा साफ करण्यसाठी उपयोग होतो. पाण्यात लिंबू रस मिसळून त्या पाण्याने आरसा पुसल्यास आरसा चमकतो. व्हिनेगर (Vinegar) - व्हिनेगर एका स्प्रे बाटलीत भरून ते आरश्यावर शिंपडून त्याने आरसा साफ केल्यास आरसा चमकदार दिसतो.

  (हे वाचा - आई-वडिलांच्या घटस्फोट प्रकरणात मुलाला 10 कोटी डॉलरचा दंड! काय आहे अजब प्रकरण?)

  बेकिंग सोडा (Baking soda) - बेकिंग सोड्यानेही काच उजळते. त्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून मिश्रण तयार करा आणि त्यानंतर त्या पाण्याने, सुती कापडाने काच साफ करावी त्याने काच स्वच्छ होते. तसंच त्यावरील डाग निघून जातात. टॅल्कम पावडर (talcum powder) -

  (हे वाचा - Meditation : कोरोना काळात तणावासह आजारांनाही दूर ठेवण्याचा सोपा मार्ग)

  रोजच्या वापरातील टॅल्कम पावडर वापरून काच स्वच्छ होते. यासाठी थोडी पावडर काचेवर पसरवावी. त्यानंतर एका कापडाने काच पुसावी. पण यात पाण्याचा वापर करू नये. त्याने काचेवर बोटांचे ठसे उमटतील. त्यामुळे सुकी पावडर वापरूनच काच स्वच्छ करावी.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Daily news, Lifestyle

  पुढील बातम्या