मुंबई, 5 ऑक्टोबर : डेंग्यू एकदा वाढीस लागला की, त्याचा प्रसार झपाट्याने वाढतो. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना डेंग्यू झाला आहे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला डेंग्यू झाला आहे, त्यांच्या प्लेटलेटच्या संख्येवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या प्लेटलेटची संख्या कमी होत असेल तर ती धोक्याची बाब ठरू शकते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. या पदार्थांच्या मदतीने आपले आरोग्य सुधारते आणि प्लेटलेट काउंटमध्ये झपाट्याने वाढ होते. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, अशी अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत जी प्लेटलेट्स वाढविण्यात मदत करू शकतात. त्यामुळे डेंग्यू झाल्यावर प्लेटलेट्स झपाट्याने वाढवण्यासाठी तुम्ही या पदार्थांचा समावेश करू शकता.
Diabetes ला रोखण्याचा सोपा मार्ग; लक्षणं दिसताच त्वरित करा हे 5 उपायप्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी खा हे पदार्थ फोलेट समृद्ध अन्न : फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन बी निरोगी रक्त पेशी वाढवते. अशा परिस्थितीत तुम्ही आहारात अधिकाधिक हिरव्या पालेभाज्या, बीन्स, भात इत्यादींचा समावेश करावा.
व्हिटॅमिन बी 12 समृद्ध अन्न : व्हिटॅमिन बी 12 लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या कमतरतेमुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. यासाठी तुम्ही बीफ लिव्हर, अंडी, सॅल्मन, बदामाचे दूध, सोया मिल्क इत्यादींचे सेवन करावे. व्हिटॅमिन सी समृद्ध अन्न : व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच प्लेटलेट्स वाढण्यास मदत करते. यासाठी ब्रोकोली, स्प्राउट्स, लाल हिरवी शिमला मिरची, संत्री इत्यादींचे सेवन करा. व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न : संशोधनात असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन डी अस्थिमज्जा पेशींच्या निर्मितीस मदत करते जे प्लेटलेट्स आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. यासाठी अंडी, तेल मासे, डाळी, मशरूम इत्यादींचे रोज सेवन करावे.
या 7 कारणांमुळे तरुणांनाही येतोय हार्ट अटॅक! तुम्ही या चुका तर करत नाही ना?व्हिटॅमिन के समृद्ध अन्न : रक्त गोठणे आणि हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन के एक आवश्यक घटक आहे. हे प्लेटलेटची संख्या सुधारण्यास मदत करते. यासाठी आहारात सूर्यफूल, ब्रोकोली, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सोयाबीन, भोपळा इत्यादींचे सेवन करावे.