मुंबई, 9 फेब्रुवारी : हल्ली आपली जीवनशैली धावपळीची झाली आहे. त्यामुळे वजन वाढणे आणि इतर आजारांचा धोकाही खूप वाढला आहे. असाच एक त्रास म्हणजे पित्ताशयातील खडे. कधीकधी पित्ताशयामध्ये कोलेस्टेरॉल, बिलीरुबिन आणि पित्त क्षार साचतात. यातील बहुतांश खडे कोलेस्टेरॉलपासून बनलेले असतात. हळूहळू ते कडक होतात आणि पित्ताशयाच्या आत खड्यांचे रूप धारण करतात. यावर उपचार म्हणून अनेक डॉक्टर ऑपरेशन करण्याचाच सल्ला देतात. पण पित्ताशयाच्या खड्यांवर काही घरगुती उपायदेखील शक्य आहेत. यासाठी काही पदार्थ तुम्हाला हे खासडे बाहेर काढण्यास मदत करू शकतात. मात्र पित्ताशयातील खड्यांची समस्या वाढू नये म्हणूनही काही पदार्थ टाळणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही या समस्यादरम्यान अजिबात खाऊ नये.
Food To Increase Platelet Count : हे पदार्थ खाल्ल्यानंतर काही तासांतच वाढतील प्लेटलेट्स; डेंग्यूपासून लगेच होईल सुटकातळलेले पदार्थ तुम्हाला जर तळलेले पदार्थ खाण्याची सवय असेल तर ती त्वरित बंद करा. तळलेले पदार्थ जसे की, फ्राईज, बटाटा चिप्स चॅटमधील इतर पदार्थ, सॅच्युरेटेड किंवा हायड्रोजनेटेड फॅट्स यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो. हे पदार्थ पित्ताशयामधील खड्यांमुळे होणाऱ्या वेदना वाढवू शकतात.
हवाबंद पदार्थ हल्ली लोक सहज उपलब्ध असलेले आणि कमी वेळात खाण्यासाठी तयार होणारे पॅकेज्ड फूड खाण्यास प्राधान्य देतात. मात्र असे हवाबंद पदार्थ तुमच्या रोग्यांसाठी खूप हानिकारक असतात. यातील ट्रान्स फॅटी ऍसिडमुळे पित्ताशयामधील खडे वाढण्याचा धोका वाढतो. दूध आणि दुधाचे पदार्थ झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, काही पदार्थ पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास होत असताताना खाऊ नये. यातीलच एक पदार्थ म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ. दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये जास्त फॅट्स असतात आणि जास्त फॅटयुक्त पदार्थ खाणे पित्ताशयातील खड्यांच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. आपण चीज, लोणी, साय असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. लाल मांस प्रोटीनचा उत्तम स्रोत असलेले लाल मांसमध्ये फॅटचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे गॉलब्लॅडर स्टोन असलेल्या लोकांनी हे खाऊ खाऊ नये. यामुळे वेदना वाढू शकतात. या 7 कारणांमुळे तरुणांनाही येतोय हार्ट अटॅक! तुम्ही या चुका तर करत नाही ना? पांढऱ्या रंगाचे पदार्थ ज्या लोंकांना गॉलब्लॅडर स्टोनचा त्रास आहे त्यांनी पांढऱ्या रंगाचे पदार्थ जसे की, तांदूळ, शुद्ध साखर, पांढरा ब्रेड, मैदा आणि पास्ता हे पदार्थ खाऊ नये. या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते जे पित्ताशयाच्या खड्यांचे प्रारंभिक कारण आहे.