जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ही लक्षणं सांगतात, दारूने तुमचं लिव्हर झालंय खराब! चुकूनही करू नका दुर्लक्ष

ही लक्षणं सांगतात, दारूने तुमचं लिव्हर झालंय खराब! चुकूनही करू नका दुर्लक्ष

ही लक्षणं सांगतात, दारूने तुमचं लिव्हर झालंय खराब! चुकूनही करू नका दुर्लक्ष

जेव्हा आपल्या लिव्हरमध्ये चरबी जमा होते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. जास्त धुम्रपान, दारू पिणे, अनावश्यक औषधे घेणे यामुळे हा आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जानेवारी : फॅटी लिव्हर डिसीज ही अशीच एक समस्या आहे, जी आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहे. जेव्हा आपल्या लिव्हरमध्ये चरबी जमा होते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. जास्त धुम्रपान, दारू पिणे, अनावश्यक औषधे घेणे यामुळे हा आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. या आजारात लिव्हर दिवसेंदिवस खराब होत जाते. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर या आजाराची लक्षणे बहुतेक लोकांमध्ये आढळत नाहीत, परंतु वेळीच काळजी न घेतल्यास भविष्यात लिव्हरचे मोठे नुकसान होऊ शकते. मात्र जे लोक अल्कोहोल घेतात, त्यांच्यामध्ये काही प्रमुख लक्षणं दिसतात. खरं तर 90 टक्के फॅटी लिव्हर प्रकरणे मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये आढळतात असेही म्हंटले जाते.

थंडीत का वाढतो अस्थमा अटॅकचा धोका? बचावासाठी या गोष्टींची नक्की घ्या काळजी

अल्कोहोल घेणाऱ्या लोकांमध्ये दिसतात ही लक्षणं मळमळ, उलट्या : आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अल्कोहोलिक हेपेटायटीसची समस्या असताना मळमळ आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसू लागतात. त्यासोबतच पोटदुखी, काहीसा तापही लिव्हरच्या आजाराची लक्षणे असू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

वजन कमी होणे : जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने व्यक्तीच्या भूकेवर त्याचा वाईट परिणाम होतो. भूकेवर परिणाम झाल्याने वजन झपाट्याने कमी होऊ लागते. याशिवाय फॅटी लिव्हर आजारामुळे शरीरात इतरही अनेक बदल दिसतात. थकवा : तुमच्या लिव्हरला काही त्रास असेल, मग ते मद्यपानामुळे असो किंवा इतर कोणत्याही कारणामुळे. तर तो त्रास थकव्याच्या स्वरूपातच आधी दिसतो. जर तुम्हाला जास्त थकवा जाणवत असेल तर हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. भूक न लागणे : जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतल्यामुळे बऱ्याचदा भूक मंदावण्याची शक्यता असते. त्यामुळे असा काही त्रास झाल्यास ते लिव्हरच्या आजाराचे लक्षण असू शकते. त्याचप्रमाणे कमी जेवल्याने शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. सर्वच गाठी ब्रेस्ट कॅन्सरच्या नसतात! पाहा कॅन्सरयुक्त आणि नॉन कॅन्सर गाठीतील फरक (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात