जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Depression: ताण-तणाव वाढलेत, डिप्रेशनमध्ये जाल! या हेल्दी सवयी सर्वांसाठीच आहेत बेस्ट

Depression: ताण-तणाव वाढलेत, डिप्रेशनमध्ये जाल! या हेल्दी सवयी सर्वांसाठीच आहेत बेस्ट

Depression: ताण-तणाव वाढलेत, डिप्रेशनमध्ये जाल! या हेल्दी सवयी सर्वांसाठीच आहेत बेस्ट

अनियंत्रितपणे तणावाचा व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नैराश्य येऊ शकते. उदासीनता किंवा जास्त नैराश्य येणं यामुळे व्यक्तीचे जीवन पूर्णपणे नकारात्मक आणि तणावग्रस्त होऊ (Depression Symptoms And Cure) शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै : ताणतणाव हा अलिकडे जीवनाचा एक भाग बनला आहे. प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ताण-तणावाला सामोरं जावं लागतं. तसे किरकोळ तणावाचे काही फायदे देखील आहेत, जसे की कोणत्याही दबावाखाली आल्यावरच आपण कामाचे गांभीर्य समजतो आणि ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करतो. परंतु, अनियंत्रितपणे तणावाचा व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नैराश्य येऊ शकते. उदासीनता किंवा जास्त नैराश्य येणं यामुळे व्यक्तीचे जीवन पूर्णपणे नकारात्मक आणि तणावग्रस्त होऊ (Depression Symptoms And Cure) शकते. नैराश्येची अनेक कारणे असू शकतात, जसे की आयुष्यात मोठा बदल किंवा एखादी अप्रिय घटना. अनेक वेळा शारीरिक आजारामुळे किंवा हार्मोन्समधील बदलांमुळे आपण नैराश्याला बळी पडू शकतो. नैराश्याची लक्षणे - अस्वस्थ किंवा दुःखी असणे आणि सर्व वेळ चिंतेत असणे, रडणे. प्रत्येक गोष्टीचा नकारात्मक पद्धतीने विचार करणे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड आणि राग येणे किंवा आजूबाजूच्या कोणाशीही जास्त न बोलणे. सतत थकवा जाणवणे आणि कोणत्याही कामात भाग न घेणे. - रात्री झोपण्यामध्ये आणि सकाळी उठण्यामध्येही अडचणी इ. या नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून तुम्ही नैराश्यावर मात करू शकता - नैराश्य ही औषधे देऊन ताबडतोब बरी होण्याची समस्या नाही, म्हणूनच सर्व पद्धती समजून घेऊन त्याचा सकारात्मक पद्धतीने अवलंब केला पाहिजे. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, दररोज सुमारे 30 मिनिटे किंवा आठवड्यातून तीन ते चार वेळा एरोबिक्स आणि व्यायाम हे नैराश्याच्या लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे आणि व्यायामामुळे अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. हे वाचा -  महागड्या आणि केमिकल हेअर रिमूव्हल क्रीम खरेदी करू नका; हा आहे सोपा घरगुती उपाय नैराश्यासाठी रोज ध्यान-धारणा किंवा मेडिटेशन केल्यास तणाव आणि चिंता दूर होते. रोज एक तास योगाभ्यास करता येतो. असे केल्याने शरीराची लवचिकता वाढते आणि मन एकाग्र होते. हे वाचा -  Health Tips : रात्रीच्यावेळी कोणत्या कुशीवर झोपणे असते अधिक फायदेशीर? उदासीनतेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही म्युझिक थेरपीचीही मदत घेऊ शकता, संगीत ऐकल्याने मन शांत होते, शरीराच्या स्नायूंना आराम मिळतो आणि आपल्या सकारात्मक ऊर्जा जाणवते. या गोष्टींनीही आराम वाटत नसल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात