मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महागड्या आणि केमिकल हेअर रिमूव्हल क्रीम खरेदी करू नका; हा आहे सोपा घरगुती उपाय

महागड्या आणि केमिकल हेअर रिमूव्हल क्रीम खरेदी करू नका; हा आहे सोपा घरगुती उपाय

 हेअर रिमूव्हिंग क्रिम प्रत्येकाच्या त्वचेला योग्य ठरेल याची शक्यता नसते. कधीकधी या क्रिममुळे त्वचेवर रॅश, पुरळ उठतात, तर कधी ती त्वचा काळवंडते.

हेअर रिमूव्हिंग क्रिम प्रत्येकाच्या त्वचेला योग्य ठरेल याची शक्यता नसते. कधीकधी या क्रिममुळे त्वचेवर रॅश, पुरळ उठतात, तर कधी ती त्वचा काळवंडते.

हेअर रिमूव्हिंग क्रिम प्रत्येकाच्या त्वचेला योग्य ठरेल याची शक्यता नसते. कधीकधी या क्रिममुळे त्वचेवर रॅश, पुरळ उठतात, तर कधी ती त्वचा काळवंडते.

नवी दिल्ली, 7 जुलै : सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया नाना तऱ्हेचे उपाय करत असतात. यात कधीकधी नको त्या जागी उगवलेल्या केसांचा अडथळा येतो. अर्थात हल्ली त्यासाठीही अनेक हेअर रिमूव्हिंग क्रीम (Hair Removing Cream), रेझर्स दुकानात उपलब्ध आहेत. वॅक्स (Wax) वापरूनही केस काढता येऊ शकतात. वॅक्सच्या पर्यायात थोडं दुखू शकतं. त्यामुळे काहींना हा पर्याय पसंत नसतो. हेअर रिमूव्हिंग क्रिम प्रत्येकाच्या त्वचेला योग्य ठरेल याची शक्यता नसते. कधीकधी या क्रिममुळे त्वचेवर रॅश, पुरळ उठतात, तर कधी ती त्वचा काळवंडते. त्वचेवरील नको असलेले केस काढण्यासाठी घरच्याघरीच एक साधा उपाय (Hair Removing Tips) करता येऊ शकतो. त्यामुळे त्वचेलाही काही त्रास होणार नाही. बोल्डस्काय डॉट कॉम या वेबसाइटनं यासंबंधी वृत्त दिलं आहे.

बरेचदा घरात वापरून छोटा झालेला साबण आपण फेकून देतो. मात्र अशा साबणाच्या तुकड्यांचा वापर (Homemade Soap) करूनही काही उपयोगी गोष्ट करता येऊ शकते. वापरून शिल्लक राहिलेल्या साबणापासून हेअर रिमूव्हिंग सोप तयार करता येतो. त्यामुळे केस काढणं सोपं होऊ शकतं. हेअर रिमूव्हिंग सोप तयार करण्यासाठी साबणाचे तुकडे, बेरिअम सल्फेट पावडर आणि हळद (Turmeric) हे साहित्य लागेल.

हेअर रिमूव्हिंग सोप कसा तयार कराल?

- शिल्लक राहिलेल्या साबणांचे तुकडे एकत्र करा.

- वॅक्स हिटरमध्ये हे तुकडे गरम करायला ठेवा.

- सगळे तुकडे वितळले, की हीट कमी करा. साबण जळणार नाही याकडे लक्ष द्या.

- साबण व्यवस्थित वितळला, की त्यात बेरिअम सल्फेटची पावडर व हळद घाला.

- सगळं व्यवस्थित एकत्र करा व हव्या त्या मोल्डमध्ये भरून थंड करा.

- आता तुमचा हेअर रिमूव्हिंग सोप तयार झाला.

हा साबण वापरायला अतिशय सोपा आहे. साबण वापरण्याआधी ती जागा पाण्यानं ओली करून (Use On Wet Skin) घ्या. मग त्यावर हळूहळू घासून साबण लावा. त्या भागातील केस आपोआप निघून जातील. मात्र साबण कोरड्या त्वचेवर कधीही लावू नका. तसंच ज्या भागातील केस काढायचे आहेत, तिथे तेल किंवा क्रिम लावलेले असू नये. नाहीतर केस निघणार नाहीत. ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे, त्यांनी साबणाचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हा साबण बाहेरच्या त्वचेवर असलेले केस काढण्यासाठी असल्यानं शरीराच्या खासगी भागावरील केस काढण्यासाठी याचा वापर करू नये. त्वचेवर जखम असल्यास ती बरी झाल्यावरच साबण वापरावा. तसंच साबणाचा वापर केल्यानंतर त्वचेला मॉईश्चराईज करावं.

अशा पद्धतीनं केस काढण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया वेळ काढूनच करा. हात, पाय, पोट आणि पाठीवरील केस काढण्यासाठी या साबणाचा वापर करता येईल. इतर कोणत्या मार्गानं नको असलेले केस काढताना त्वचेवर पुरळ उठतात किंवा त्वचा जळजळते. कधीकधी त्वचेला खाजही सुटते. मात्र घरच्याघरी हा सोपा उपाय केल्यास त्वचेला इजा न होता नको असलेल्या केसांपासून सुटका होऊ शकते.

First published:

Tags: Woman hair, Women hairstyles