Home /News /lifestyle /

Almonds Side Effect : बुद्धी तल्लग करणारे बदाम अति प्रमाणात खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

Almonds Side Effect : बुद्धी तल्लग करणारे बदाम अति प्रमाणात खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

बदामाचे आरोग्याला केवळ फायदेच नाहीत. तर काही धोकेदेखील आहेत. हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी आणि किडनी स्टोन असणाऱ्यांनी बदाम खाऊ नयेत. बदामाचे आरोग्याला केवळ फायदेच नाहीत तर काही धोकेदेखील आहेत.

  मुंबई, 28 जून : बदाम आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. आपल्यापैकी बहुतेकांना बदाम खाण्याची सवय असते. यामध्ये प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे शरीराला शक्ती देतात. मात्र काही बाबतीत बदाम खाणे खूप धोकादायक ठरू शकते. बदामाचे आरोग्याला केवळ फायदेच नाहीत. तर काही धोकेदेखील आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बदामाच्या सेवनाच्या (Almonds Side Effect) काही साईड इफेक्ट्सबद्दल माहिती देणार आहोत. हाय ब्लड प्रेशरसाठी घातक हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी बदाम खाऊ नयेत. उच्च रक्तदाबाचे (Risk Of High Blood Pressure) रुग्ण त्यांचे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काही औषधे घेतात. त्यामुळे त्या औषधांसोबत बदाम खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. किडनी स्टोनचा धोका किडनी स्टोन असणाऱ्यांनी (Risk Of Kidney Stone) बदाम खाऊ नयेत. बदामामध्ये ऑक्सलेट असते. यामुळे त्यांच्या समस्या वाढतात. किडनी स्टोन असलेल्या लोकांना बदाम न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

  मुलांसाठी हानिकारक आहे जंक फूड; जाणून घ्या मोठे दुष्परिणाम

  हॅमरेज आणि शरीरात टॉक्सिन्स वाढणे बदाम व्हिटॅमिन ईने समृद्ध असते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास व्हिटॅमिन ओव्हरडोस होऊन हॅमरेज (Risk Of Hama rage) सारख्या गंभीर स्वमस्या निर्माण होऊ शकतात. बदामाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्यामुळे शरीरात विषारी पदार्थांचे प्रमाणही वाढू शकते. हे आपल्या पोटासाठी खूप त्रासदायक असते. त्यामुळेच गरोदर महिलांना बदाम न खाण्याचा सल्ला दिला जातो. बद्धकोष्ठतेचा त्रास आणि पोषणास अडथळा पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी (Constipation) बदाम टाळावेत. बदामामध्ये प्रोटीन आणि जीवनसत्त्वे जास्त असतात. यामुळे बदाम लवकर पचत नाहीत. त्याचबरोबर ज्यांना अॅसिडिटीची समस्या (Acidity) आहे त्यांनीही बदाम खाऊ नयेत. बदामामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे अपचन आणि गॅसची समस्या वाढते. बदामाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास यामध्ये असलेल्या फायबरमुळे कॅल्शियम, लोह, झिंक आणि मॅग्नेशियमचे शरीरात शोषण होण्यात अडथळा निर्माण होतो.

  Male Fertility: दुर्लक्ष टाळा, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी ठरू शकते धोकादायक

  वजन वाढणे तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर बदाम खाऊ नका. बदामामध्ये कॅलरी आणि फॅट जास्त असते. यामुळे तुमचे वजन कमी होणार नाही उलट आणखी वाढण्याची (Weight Gain) शक्यता आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Side effects

  पुढील बातम्या