मुंबई, 26 मार्च : उन्हाळ्यात लोकांना बहुतेकदा त्वचेला खाज सुटण्याची समस्या उद्भवते. अनेकांना पुरळ येऊन खाज येते तर अनेकांना नुसती खाज येते. नुसती खाज येण्याचं कारण हे धूळ, माती आणि प्रदूषण हे असतं. पुरळासह होणारी खाज ही ऊन, धूळ किंवा एखाद्या संसर्गामुळं होते. यापासून आराम मिळवण्यास लोक विविध प्रकारचे महागडे प्रॉडक्ट्स वापरतात. त्यात रसायनं असतात. यावर पैसा खर्च होतो आणि समस्याही दूर होण्याची पूर्ण खात्री नसते. शरीरावर त्यामुळे काही साईड इफेक्ट्सही होऊ शकतात. यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊ ज्याद्वारे खाजेपासून सुटका मिळवता येईल. शिवाय त्वचा मुलायम आणि कोमलही बनेल. एलोव्हेरा जेल एलोव्हेरा अर्थात कोरफडीचे जेल वापरल्याने खाजेची समस्याच दूर होते. यासाठी 3-4 चमचे एलोव्हेरा जेल घेऊन त्वचेवर चांगलं चोळा आणि वीस मिनिटांनी पाण्यानं धुवा.
लिंबाची पानं लिंबाची पानं धुवून त्याची पेस्ट बनवा. खाजवत असलेल्या जागेवर ती लावा. असे केल्यानं खाजेपासून दिलासा मिळतो. वाटल्यास लिंबाची पानं धुवून उकळून थंड करून त्या पाण्यानं अंघोळही करू शकता. तुळशीची पानं तुळशीची पानं धुवून बारीक वाटा. यात थोडं नारळाचं तेल मिसळा. ही पेस्ट खाजणाऱ्या जागेवर लावा. यातून त्वचेला थंडावा आणि आर्द्रता मिळते. सायलेंट हार्ट अॅटॅकविषयी तुम्हाला माहितीय का? नेमकं काय आहे लिंबाचा रस एक बकेट पाण्यात एका लिंबाचा रस पिळा. या पाण्यानं अंघोळ केल्यास खाज दूर होते. खाजेच्या जागेवर लिंबाचा स्लाईसही चोळू शकता. खोबरेल तेल खाजेपासून सुटका मिळवण्यास खोबरेल तेलही वापरू शकता. यासाठी अंघोळीनंतर रोज सगळ्या शरीरावर खोबरेल तेल लावा. बदलत्या वातावरणात होणाऱ्या अंगदुखीला कंटाळलात? घरीच करा हे सोपे उपाय चंदन आणि गुलाबजल खाज दूर करण्यास चंदनाचा उपयोग होतो. यासाठी 2-3 चमचे चंदन पावडरमध्ये 5-6 चमचे गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट खाजेच्या जागी लावा. वाटल्यास ती सगळ्या शरीरावरही लावू शकता. सुकल्यावर थंड पाण्यानं धुवा. (Disclaimer - या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)