दीर्घकाळ शारीरिक हालचालींमुळे शरीरात वेदना होतात. त्याचबरोबर तणाव, निर्जलीकरण आणि झोपेची कमतरता, थकवा, कामाच्या डेस्कवर बराच वेळ बसून राहणे किंवा आरोग्याच्या स्थितीमुळे बॉडी पेन होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला बॉडी पेनपासून त्वरित आराम मिळवून देण्यासाठी काही घरगुती उपायांबद्दल माहिती देणार आहोत.
मीठ पाणी : मीठ घातलेले पाणी जळजळ कमी करते, स्नायूंच्या दुखण्यापासून आराम देते आणि स्नायूंमधील तणावदेखील कमी करते. वर्कआउट किंवा शारीरिक हालचालींमुळे शरीरातील वेदना कमी करण्यासाठी हे चांगले आहे. यासाठी कोमट पाण्याने भरलेल्या टबमध्ये 1 कप मीठ मिसळा. या पाण्यात दुखत असलेला अवयव १५-२० मिनिटे ठेवा किंवा खारट पाण्यात टॉवेल भिजवून दुखत असलेल्या भागावर ठेवू शकता.
हॉट कॉम्प्रेस : स्नायूंचा आखडलेपणा कमी करण्यासाठी आणि रक्त प्रवाह सुधारण्यासाठी हॉट कॉम्प्रेस हा एक चांगला मार्ग आहे. यासाठी दुखत असलेल्या भागावर हीटिंग पॅड किंवा कोमट पाण्यात बुडवलेला टॉवेल ठेवा. हीटिंग पॅड किंवा टॉवेल जास्त गरम नसावा. कारण त्यामुळे तुमची त्वचा जळू शकते.
बर्फ पॅक : स्नायूंमध्ये वेदना आणि सूज यासाठी बर्फाचा पॅक वापरा. हे दुखत असलेला भाग सुन्न करते आणि रक्तस्त्राव कमी करते. प्लास्टिकच्या पिशवीत काही बर्फाचे तुकडे घेऊन ती सील करा. त्यानंतर पिशवी टॉवेलमध्ये गुंडाळून दुखत असलेल्या भागावर ठेवा. मात्र बर्फ जास्त काळ एकाच जागेवर ठेवू नका.
मसाज : शरीरातील वेदना कमी करण्यासाठी योग्य प्रकारे मसाज केल्यास ऊतींना आराम मिळतो, ताण कमी होतो आणि मज्जातंतूंचा दाब कमी होण्यास मदत होते. कोमट मोहरीच्या तेलाने मसाज करावी. यासाठी दुखत असलेल्या अवयवावर हळूवारपणे मसाज करू शकता.
आलं : आले वेदनाशामक आणि विरोधी दाहक कम्पाऊंडने भरलेले आहे. आलं खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कोमट पाण्यात. एक इंच आलं घेऊन एका भांड्यात एक कप पाण्यात ते उकळा. हे मिश्रण गाळून घ्या आणि पुरेसे थंड झाल्यावर ते प्या. पेय गोड करण्यासाठी तुम्ही यात मध घालू शकता.