जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सायलेंट हार्ट अ‍ॅटॅकविषयी तुम्हाला माहितीय का? नेमकं काय आहे

सायलेंट हार्ट अ‍ॅटॅकविषयी तुम्हाला माहितीय का? नेमकं काय आहे

silent heart attack

silent heart attack

गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हार्ट अ‍ॅटॅकच्या बळी ठरत आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 25 एप्रिल : गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हार्ट अ‍ॅटॅकच्या बळी ठरत आहेत. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक ही आता फक्त ‘पुरुषांची समस्या’ राहिलेली नाही. अलीकडच्या काळात स्त्रियांनादेखील हार्ट अ‍ॅटॅकचा सामना करावा लागत आहे. अनेक जण सायलेंट हार्ट अ‍ॅटॅकचे बळी ठरत आहेत. हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्सचे क्लिनिकल डायरेक्टर आणि इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजीचे सीनिअर कन्सल्टंट व टीएव्हीआरचे प्रमाणित प्रॉक्टर डॉ. व्ही. राजशेखर सांगतात, “सायलेंट हार्ट अ‍ॅटॅक ही अशी समस्या आहे ज्यामध्ये संभाव्य हार्ट अ‍ॅटॅकची फारच कमी प्रमाणात लक्षणं दिसतात.” ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हार्ट अ‍ॅटॅकला ‘सायलेंट’ तेव्हाच म्हणतात जेव्हा छातीत दुखणं, हात व मान दुखणं यासारखी लक्षणं व्यक्तीला जाणवत नाहीत. डॉ. व्ही. राजशेखर म्हणतात, “सायलेंट हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं अशी असू शकतात जी निरुपद्रवी वाटतात. ही लक्षणं जाणवू लागली तरी छातीत जळजळ किंवा अपचन यासारख्या सामान्य समस्या असल्याचा व्यक्तीचा समज होतो.”

    News18लोकमत
    News18लोकमत

    सायलेंट हार्ट अ‍ॅटॅक आलेल्यांपैकी बहुतांश व्यक्तींना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणि हार्वर्ड हेल्थनं केलेल्या 2015मधील एका अभ्यासानुसार, 45 ते 84 वर्षे वयोगटातील जवळजवळ दोन हजार व्यक्ती ज्यांना कधीही हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार नव्हता त्यांनादेखील पुढील 10 वर्षांत हार्ट अ‍ॅटॅक आला आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या शरीरावर मायोकार्डियल स्कार्स होते. “सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यापैकी 80 टक्के लोकांना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती नव्हती. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मायोकार्डियल स्कार्स होण्याचे प्रमाण पाच पट जास्त होतं,” असंही या अभ्यासात निदर्शनास आलं. डॉ. व्ही. राजशेखर म्हणतात, “सायलेंट हार्ट अ‍ॅटॅकची रिस्क ओळखणं अशक्य आहे.” तज्ज्ञ म्हणतात, सामान्य हार्ट अ‍ॅटॅकच्या लक्षणांप्रमाणेच सायलेंट हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं असतात. यामध्ये डायबेटिस, हायपरटेन्शन, वृद्धत्व, धूम्रपान, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, हृदयविकाराची फॅमिली हिस्ट्री, हाय कोलेस्टेरॉल यांचा समावेश होतो. विशेषत: डायबेटिस असलेल्या वृद्धांना जास्त प्रमाणात सायलेंट हार्ट अ‍ॅटॅकचा सामना करावा लागतो. हेही वाचा -  व्हिडीओ बघताना मोबाईलचा झाला स्फोट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू एखाद्याला वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. छातीत दुखणं, छातीत अस्वस्थता जाणवणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, जबडा, मान किंवा पाठीत वेदना होणं, हात आणि खांदे दुखणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं ही हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणं आहेत. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान छातीत दुखण्याचं स्वरूप यूएस सीडीसीनं स्पष्ट केलं आहे. त्यानुसार, “बहुतेक हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला अस्वस्थता जाणवते. जी काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते किंवा कमी-जास्त होते. या दरम्यान छातीवर प्रेशर येणं, पीळ पडल्यासारखं वाटणं किंवा भयंकर वेदना जाणवतात.” बहुतेक हार्ट अ‍ॅटॅक हे अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे येतात. कमी शारीरिक हालचाल, अनियमित झोपेची वेळ, धूम्रपान, तंबाखू, जास्त प्रमाणात मद्यपान, पुरेसे पौष्टिक पदार्थ न खाणं, बाहेरचं जेवण जास्त प्रमाणात खाणं, अनहेल्दी तेल खाणं आणि आरोग्याची नियमित तपासणी न करणं यासारख्या सवयी जीवघेण्या आजारांना निमंत्रण देतात. डॉ. व्ही. राजशेखर सांगतात, “म्हणूनच अनेक रिस्क फॅक्टरशी संबंधित असलेल्यांनी सायलेंट हार्ट अॅटॅकची समस्या ओळखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी केली पाहिजे. हा धोका कमी करण्यास मदत करणारी अनेक औषधं आणि उपचार अस्तित्वात आहेत. रिस्क फॅक्टरशी संबंधित असलेल्यांनी अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.”

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात