Home /News /lifestyle /

Artificial Sweeteners: शुगर फ्री टॅबलेट खाणे योग्य आहे का, जास्त प्रमाणात खाल्यास काय होतात दुष्परिणाम?

Artificial Sweeteners: शुगर फ्री टॅबलेट खाणे योग्य आहे का, जास्त प्रमाणात खाल्यास काय होतात दुष्परिणाम?

शुगर फ्री टॅब्लेट्स साखरेसारख्या चवीला गोड असतात मात्र यामध्ये कॅलरीज नसतात. त्यामुळे मधुमेह असलेले लोक याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र याचे सुद्धा अनेक दुष्परिणाम आहेत.

  मुंबई, 19 जून : सध्या जग खूप झपाट्याने बदलत आहे. आता आपल्याकडे प्रत्येक वस्तूला प्रत्येक पदार्थाला पर्याय उपलब्ध आहे. माणसाने हल्ली आपल्या सोयीसाठी अनेक नवनवीन सध्या लावले आहेत आणि अजूनही ते सुरूच आहे. साधारणपणे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना गोड पदार्थ म्हणजेच साखर खायला चालत नाही. आपल्याकडे यासाठीदेखील पर्याय उपलब्ध आहे. कृत्रिम स्वीटनर (Artificial Sweeteners) म्हणजेच शुगर फ्री टॅब्लेटचा. आज आपण शुगर फ्री टॅब्लेट्सच्या (Sugar Free Tablet) साईड इफेक्टबद्दल बोलणार आहोत. शुगर फ्री टॅब्लेट्स साखरेसारख्या चवीला गोड असतात मात्र यामध्ये कॅलरीज नसतात. त्यामुळे मधुमेह असलेले लोक याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र याचे सुद्धा अनेक दुष्परिणाम आहेत. कृत्रिम स्वीटनरच्या अतिवापरामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. त्याचबरोबर या टॅब्लेट्समुळे वजन वाढणे म्हणजेच लठ्ठपणाचा धोका निर्माण होऊ शकतो. कृत्रिम स्वीटनरचा अतिवापर केल्यास कॅन्सर (Artificial Sweeteners Leads To Cancer) होण्याचीदेखील शक्यता असते.

  अरे देवा! कोरोना महासाथीत आता Acute enteric epidemic; नव्या आजाराच्या उद्रेकाने चिंता वाढवली

  शुगर फ्री टॅबलेटमुळे आपल्या भूकेवर परिणाम होतो. याचा पचनसंस्थेवर आणि आतड्यांमध्‍ये असल्‍या बॅक्टेरियावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आपली पचनक्रिया मंदावते (Artificial Sweeteners Slows The Metabolism). मात्र यामुळे वजन कमी होत नाही. रागात गर्लफ्रेंडला 'या' 5 गोष्टी कधीच बोलू नका, नाही तर नात्याचा होईल काडीमोड! कृत्रिम स्वीटनरचे अतिसेवन केल्यास निद्रानाश, अस्वस्थता, चिडचिड, डोकेदुखी किंवा सांधेदुखी यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. हल्ली केवळ मधुमेह असलेले लोकच शुगर फ्री टॅब्लेटचा वापर करतात असे नाही. तर इतर लोकही या टॅब्लेटचे सेवन करतात. मात्र कोणत्याही परिस्थिती याचे सेवन करताना डॉक्टरचा सल्ला नक्की घ्यावा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Cancer, Diabetes, Sugar

  पुढील बातम्या