Home /News /lifestyle /

रागात गर्लफ्रेंडला 'या' 5 गोष्टी कधीच बोलू नका, नाही तर नात्याचा होईल काडीमोड!

रागात गर्लफ्रेंडला 'या' 5 गोष्टी कधीच बोलू नका, नाही तर नात्याचा होईल काडीमोड!

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कपलमध्ये किरकोळ भांडणे, वाद होतात. अशा परिस्थितीत अनेकदा मुलं आपल्या गर्लफ्रेंडला असे काही शब्द बोलतात ज्यामुळे नातं तुटू शकतं. त्यासाठी मुलांनी काय करायला पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहे.

    नवी दिल्ली, 16 जून : प्रेम हळूहळू फुलत जातं  असं म्हटलं जातं. नवीन नवीन सगळं काही छान असतं. कालानंतरानं मात्र याच प्रेमाच्या नात्यात दुरावा यायला लागतो, कटुता निर्माण व्हायला लागते. त्यामुळे सगळं विस्कटत जातं. कपलमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण सुरु होतं आणि दोघंही एकमेकांपासून दूर दूर राहू लागतात.  कुठल्याही रिलेशनशिपमध्ये (Relationship) दोन्ही व्यक्तींना स्पेस देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जर ती दिली गेली नाही तर मुली सहसा मुलांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कपलमध्ये  किरकोळ भांडणे, (Quarrel in the couple)वाद होतात. अशा परिस्थितीत अनेकदा मुलं आपल्या जोडीदाराला असे काही शब्द बोलतात ज्यामुळे नातं तुटु शकतं. त्यामुळे मुलांनी रागाच्याभरात काही गोष्टी जोडीदाराला बोलायच्या टाळल्या पाहिजेत. कोणत्या गोष्टींमुळे नातं तुटू शकतं किंवा कोणत्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजेत हे आपण जाणून घेऊया. 1. तुम्हाला प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर संघर्ष करावा लागेल. 'तुम्ही प्रेमाला पात्र नाही', असं अनेक वेळा मुलं रागात बोलून जातात. मात्र यामुळे तुमच्या जोडीदाराचं मन दुखू शकतं आणि नातं तुटू शकतं, त्यामुळे असं बोलणं पूर्णपणे टाळावं. 2.'मी तुझ्यावर प्रेम करून चूक केली', अशा गोष्टी तुमच्या जोडीदाराला कधी बोलू नका त्यामुळे नात्यात कटुता निर्माण होईल. यामुळे नात्याला तडाही जाऊ शकतो. यासाठी रागात काही शब्द जरा जपून वापरा. हे ही वाचा -  Weight Loss: पुरुषांनी वजन कमी करण्याचं टेन्शन सोडून द्या; फक्त या 5 सोप्या टिप्स वापरा 3. काही नात्यांमध्ये प्रत्येक छोट्या गोष्टीवर वाद होतात आणि लवकरच सलोखा होतो. आता अशा परिस्थितीत जर तुम्ही चिडलेल्या मैत्रिणीला रागाने 'हे ​​तुझं प्रत्येकवेळीच नाटक आहे' असे म्हटले तर ती आणखीनच चिडू शकते आणि नातं तोडू शकते. 4. कधीकधी गर्लफ्रेंड्ला वाटते की तुम्ही त्यांना समजून घ्यावे आणि भांडणाचे खरे कारण जाणून घ्यावे. पण रागावलेल्या मैत्रिणीला रागावून राहा, वाटेल तेव्हा बोल असं म्हटल्यावर भांडण अजून वाढू शकते. जोडीदाराला वाटेल की, तुम्ही तिला समजून घेऊ इच्छित नाही आणि तिच्या नाराजीला तुमच्या नजरेत काहीच किंमत नाही, 5. जोडीदाराला उदाहरण देऊन किंवा टोमणे मारून  भांडत असाल तर ते तुमच्या नात्यासाठी चांगलं नाही. तुझ्यापेक्षा माजी एक्स चांगली होती, अशा शब्दांत बोलल्यावर भांडण आधिक चिघळण्याची शक्यता आहे.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Couple, Relationship, Relationship tips

    पुढील बातम्या