वॉशिंग्टन, 16 जुलै : दोन डोळे, दोन कान, दोन हात, दोन पाय आपले हे अवयव आपल्याला माहिती आहेत. पण प्रजनन अवयवसुद्धा दोन (Double Reproductive System) कसं शक्य आहे? एका 23 वर्षीय महिलेला चक्क दोन व्हजायना**(Vagina)** आणि दोन गर्भाशय (Uterus) आहेत. तुम्हाला याचं आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. अमेरिकेच्या (US) टेक्सासमधील (Texas) हे विचित्र प्रकरण आहे. 23 वर्षांची हेथर वेल्पर (Heather Welper). जेव्हा वयात येऊ लागली. तेव्हा तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तिला मासिक पाळीवेळी इतर महिलांपेक्षा खूपच जास्त त्रास व्हायचा. तिला खूप वेदना व्हायच्या. इतका रक्तस्राव व्हायचा की कितीही महागडे पॅड, टॅम्पॉनचा तिला काहीच फायदा व्हायचा नाही. तिला चालणं-फिरणंही शक्य होत नव्हतं. . अखेर ती त्रासाला कंटाळून डॉक्टरांकडे गेली. त्यावेळी तिला डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून धक्काच बसला. तिला दोन दोन प्रजनन अवयव आहेत. हे वाचा - जगातील सर्वात कुरूप महिला; तिचा भयंकर चेहरा पाहण्यासाठी चक्क पैसे मोजायचे लोक द सन च्या रिपोर्टनुसार हेल्थर म्हणाली, 23 व्या वयात स्मीअर टेस्ट (Smear Test) मध्ये डॉक्टरांनी तिच्या शरीरात दोन प्रजनन प्रणाली असल्याचं सांगितलं. 25 व्या वयात तिने पुन्हा टेस्ट केली. तेव्हा ती कधीच आई होऊ शकत नाही, असं डॉक्टर तिला म्हणाले. आपल्या या समस्येमुळे आपल्यात इतर महिलांपेक्षा काहीतरी वेगळं आहे, असं तिला वाटत होतं. पण इतकं काही वेगळं असेल याची कल्पनाही तिने केली नव्हती. तिच्या शरीरातील दोन प्रजनन प्रणालीबाबत तिला काहीच माहिती नव्हती. लग्नाआधीच याबाबत तिला माहिती झाली आणि तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यात नकार दिला. पण तिच्या बॉयफ्रेंडने तिची साथ सोडली नाही. त्या दोघांनीही अखेर लग्न केलं. हे वाचा - असा असावा वाढत्या वयात आहार;बाळाचं वजन वाढेल फटाफट दरम्यान दोन प्रायव्हेट पार्ट असलेली ही एकमेव तरुणी नाही. पेनसिल्वेनियामध्ये राहणारी 20 वर्षांची पॅगी डिएंजेलो हिलासुद्धा दोन प्रजनन अवयव आहेत. डेली मेल च्या रिपोर्टनुसार पॅगीला अनियमित मासिक पाळीची समस्या होती. एकाच महिन्यात तिला दोन वेळा पीरिअड्स यायचे. दर दोन आठवड्यांनी तिला पीरिअड्स यायचे. त्यामुळे ती तपासणीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांकडे गेली आणि तेव्हा तिला दोन व्हजायना आणि दोन गर्भाशय असल्याचं निदान झालं. एका गर्भाशयातील मासिक पाळीचा कालावधी संपला की दुसऱ्या गर्भाशयातील मासिक पाळीचा कालावधी सुरू व्हायचा. पण या दोन्ही महिला आता अशात परिस्थिती आपलं आयुष्य जगत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.