मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पूर्ण झोप न घेणाऱ्यांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक; महिलांवर होतोय सर्वाधिक परिणाम

पूर्ण झोप न घेणाऱ्यांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक; महिलांवर होतोय सर्वाधिक परिणाम

या अभ्यासात सहभागी झालेल्या 55 टक्के विद्यार्थ्यांना अक्सेसिव्ह डे टाइम स्लिपीनेस (Accessive Daytime Sleepiness) ही समस्या आहे. या नावाचा अर्थ असा आहे की दिवसभर झोप येणे.

या अभ्यासात सहभागी झालेल्या 55 टक्के विद्यार्थ्यांना अक्सेसिव्ह डे टाइम स्लिपीनेस (Accessive Daytime Sleepiness) ही समस्या आहे. या नावाचा अर्थ असा आहे की दिवसभर झोप येणे.

या अभ्यासात सहभागी झालेल्या 55 टक्के विद्यार्थ्यांना अक्सेसिव्ह डे टाइम स्लिपीनेस (Accessive Daytime Sleepiness) ही समस्या आहे. या नावाचा अर्थ असा आहे की दिवसभर झोप येणे.

  नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : सध्याच्या जीवनशैलीत लवकर झोप न येणं ही समस्या खूपच सामान्य झाली आहे. पण या समस्येकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) होतो. अवेळी खाणं, कामाचा ताण, दिवस-रात्र काम करणं या सगळ्याचा तुमच्या झोपेवर खूप दीर्घकालीन परिणाम होतो. झोप न झाल्याने आपण खूप चिडचिड करतो, रागावतो, विनाकारण ओरडतो. आता विद्यार्थ्यांमध्येही ही समस्या दिसत आहे. एका नव्या अभ्यासानुसार कमी झोपल्यामुळे माणसाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. या संशोधनात सहभागी झालेल्या जवळजवळ 65.5 टक्के विद्यार्थ्यांनी आपल्याला नीट झोप लागत नसल्याचं सांगितलं याचा संबंध मानसिक आरोग्याशी (Mental Health Problems) आहे.

  पियर-रिव्ह्यू जर्नल अनल्स ऑफ ह्यूमन बायोलॉजी (Annals of Human Biology) यामध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, अपुऱ्या झोपेमुळे विद्यार्थ्यांना नैराश्य (Depression) येण्याची शक्यता 4 टक्क्यांनी वाढते.

  मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी या गोष्टी आहेत महत्त्वाच्या; त्यांच्या आहारात द्या

  या अभ्यासात सहभागी झालेल्या 55 टक्के विद्यार्थ्यांना अक्सेसिव्ह डे टाइम स्लिपीनेस (Accessive Daytime Sleepiness) ही समस्या आहे. या नावाचा अर्थ असा आहे की दिवसभर झोप येणे. म्हणजे रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांना झोप येत राहते. त्यामुळेच या विद्यार्थ्यांना नैराश्य (Depression) येण्याची किंवा मनावर जबरदस्त ताण (Stress Level) जाणवण्याची शक्यता दुप्पट होते.

  महिला किंवा विद्यार्थिनींना कमी झोप आणि ईडीएसचा अधिक त्रास होतो असं निरीक्षण या संशोधनात नोंदवण्यात आलं. त्याचा निष्कर्ष असा की महिलांना मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतात. त्यांचं मानसिक आरोग्य झोप कमी झाल्याने अधिक प्रभावित होतं.

  पुरुषांमधील कोणती गोष्ट जी स्त्रियांना त्यांच्याकडं आकर्षित करते; वैज्ञानिक कारण

  या संशोधनातील अभ्यासक फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ मॅटो ग्रोसो ब्राझीलमधील (Federal University of Mato Grosso Brazil) न्युट्रिशन विभागाचे प्रमुख डॉ. पाउलो रॉड्रिग्ज (Dr. Paulo Rodrigues) म्हणाले, ‘ झोपण्यासंबंधीच्या (sleep disorders) समस्या प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतात. त्यांच्या आजूबाजूला अनेक नकारात्मक घटना घडत असतात त्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्यांची अनुपस्थिती वाढते.

  युनिव्हर्सिटीमध्ये असलेल्या शैक्षणिक वातावरणातून निर्माण होणारा ताण आणि कमी झोप यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य प्रभावित होतं. विद्यापीठांनी यासंबंधी धोरणं तयार करून ती राबवण्यासाठी एक कार्यक्रम तयार करायला हवा. जेणेकरून मुलांना चांगल्या सवयी लावतील आणि त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहील.’

  या संशोधनात संशोधकांनी 16 ते 25 वर्षे वयातील 1 हजार 113 पदवी आणि पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अभ्यासानुसार या विद्यार्थ्यांना झोपेचा दर्जा, ईडीएस, सामाजिक आर्थिक स्थितीबाबत विचारण्यात आलं. त्यांच्या बीएमआयचाही अभ्यास करण्यात आला. या सगळ्या घटकांचा आणि नैराश्य येण्याच्या कारणांचा संबंध लावून त्याचे निष्कर्ष तयार करण्यात आले.

  First published:
  top videos

   Tags: Health, Mental health