असं नेमकं काय असतं ज्यामुळं स्त्री एखाद्या पुरुषाकडं आकर्षित होते? हे गुंतागुंतीचं कोडं समजून घेण्यासाठी जगभरातील मोठ्या विद्यापीठांचे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. जरी याविषयी अद्याप पूर्णपणे समजलेले नाही, परंतु संशोधकांनी काही मुद्दे उघड केले आहेत जे बहुतेक स्त्रियांमध्ये सामान्य (कॉमन) असतात. अशा काही व्यावहारिक गोष्टी असतात ज्या पुरुषांमध्ये पाहून स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित होतात. चला तर मग आम्ही तुम्हाला या गोष्टी सविस्तरपणे सांगत आहोत.
तुमच्या आहे त्या वयापेक्षा मोठे दिसण्याला मानसशास्त्रज्ञ 'जॉर्ज क्लूनी इफेक्ट' म्हणतात. 2010 मध्ये 3,770 विषमलैंगिक प्रौढांच्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, स्त्रिया सहसा त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांकडे आकर्षित होतात. लेखिका आणि युनिव्हर्सिटी ऑफ डंडीच्या मानसशास्त्रज्ञ फिओना मूर म्हणतात की, ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात त्या धडधाकट आणि आपल्या वयापेक्षा मोठ्या पुरुषांकडे आकर्षित होतात.
न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील संशोधकांनी 2013 मध्ये संशोधन केलं होतं त्यामध्ये महिलांना चकचकीत दाढी केलेला, मध्यम दाढी असलेला, दाट दाढी किंवा पूर्ण दाढी असलेल्या पुरुषांपैकी नेमके कोणाचे आकर्षण असते असे मत विचारले होते. त्यावर जास्त महिलांनी सांगितले की, त्यांच्यासाठी सर्वात आकर्षक पुरुष हा मध्यम दाढी असलेला असतो.