मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी या गोष्टी आहेत महत्त्वाच्या; त्यांच्या आहारात असा करा समावेश

मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी या गोष्टी आहेत महत्त्वाच्या; त्यांच्या आहारात असा करा समावेश

fruits for kids mental health: एका नवीन संशोधनात असं आढळून आलं आहे की, जी मुलं आहारात फळं आणि भाज्यांचा भरपूर समावेश करतात, त्यांचे मानसिक आरोग्य चांगले असते. हे संशोधन नुकतेच 'बीएमजे न्यूट्रिशन प्रिव्हेन्शन अँड हेल्थ' या जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर : एका नवीन संशोधनात असं आढळून आलं आहे की, जी मुलं आहारात फळं आणि भाज्यांचा भरपूर समावेश करतात, त्यांचे मानसिक आरोग्य चांगले असते. हे संशोधन नुकतेच 'बीएमजे न्यूट्रिशन प्रिव्हेन्शन अँड हेल्थ' या जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. त्यामुळे मुलांच्या आहारात अधिकाधिक फळं आणि भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. यामुळे त्यांचा शारीरिक विकास तर होईलच, पण मानसिक आरोग्यही चांगलं (fruits for kids mental health) राहील.

संशोधन काय म्हणते

संशोधनात असं आढळून आले की, ज्या मुलांनी चार किंवा पाच सर्व्हिंग किंवा त्याहून अधिक फळे आणि भाज्या खाल्ल्या त्यांचे मानसिक आरोग्य चांगले होते. म्हणूनच तुमच्या मुलांच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं आणि त्यांना फळं आणि भाज्या खायला देणं गरजेचं आहे. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांना फळं आणि भाज्या सहज खायला देऊ शकाल.

सवय लावा

मुलांना फळे आणि भाज्या खायला घालण्याची सवय लावणे फार महत्त्वाचे आहे. त्यांच्यासोबत आपणही फळे आणि भाज्या खाव्यात. मुलांनी तुम्हाला खाताना पाहिले तर ते त्यांच्या सवयीमध्येही या गोष्टींचा समावेश सहज करतील आणि आरोग्यदायी पदार्थ खाण्यास संकोच करणार नाहीत.

आहारात चार ते पाच फळांचा समावेश करा

आजकाल प्रत्येकजण लठ्ठपणा कमी करण्याच्या मागे लागला आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आणि मुलाच्या आहारात 4 ते 5 फळे आणि भाज्यांचा समावेश केलात तर तुमचे आणि त्याचे आरोग्यही चांगले राहील,

सर्जनशील व्हा

हे देखील खरं आहे की मुलांना आरोग्यदायी गोष्टी खाऊ घालणं सोपं नाही. त्यामुळे काही सर्जनशीलतेची मदत घ्या. आजकाल बाजारात असे मोल्ड आणि कटर आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही फळे आणि भाज्या वेगवेगळ्या प्रकारे कापून देऊ शकता. अशा प्रकारे मुल खेळ खेळताना फळे आणि भाज्या खातील.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Parents and child