नवी दिल्ली, 28 जुलै : अभिनेत्री आलिया भट (Actress Alia Bhat) सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह (Active On Social Media) आहे. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी आपले फोटो आणि व्हिडिओ (Photo & Video) पोस्ट करत असते. प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळेच तिने केलेल्या पोस्ट लगेच व्हायरल (Viral) होतात. यावेळी आलियाने आपल्या युट्यूब चॅनलवर (You Tube Channel) स्किन केअर रुटीन (Skin Care Routine) शेअर केलं आहे. ती सांगते की ती कधीच आपलं स्किन केअर रुटीन स्किप करत नाही. प्रवासामध्ये देखील स्किनकेअर ट्रॅव्हल बॅग (Skin Care Travel Bag) घेऊन जाते. जाणून घेऊया आलियाने दिलेल्या स्किन केअर टिप्स (Tips).
क्लिनजिंग
झोपण्याआधी आलिया चेहरा स्वच्छ करण्याला महत्त्व देते. यासाठी ती चांगल्या क्वालिटीचं क्लिंजर वापरते. ती सांगते की आपल्या त्वचेच्या पोतानुसार फेसवॉश किंवा क्लिंजरची निवड करावी. क्लिंजिंगसाठी वॉटर बेस्ड किंवा ओईबेस्ड किंवा बाम क्लिंजरही वापर करता येऊ शकतं.
('या' पाच राशींच्या लोकांना आवडते फक्त Solo Travelling)
फेस रोलर
आलिया भट आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये फेस रोलरला महत्त्व देते. तिच्यामते फेस रोलरमुळे त्वचेमध्ये वॉटर रेटेन्शन आणि ब्लड सर्क्युलेशन वाढतं. मॉर्निंग शूट करतांना मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर फेस रोलरचा वापर करते. यामुळे कॉलेजन बूस्ट होतं आणि त्वचेवरील सुच आणि फाईन लाइन्स कमी होतात.
(खगोलप्रेमींसाठी आज पर्वणी! दुहेरी उल्कावर्षाव पाहण्यासाठी राहा सज्ज)
आयस्क्रीम
डोळ्याखालील काळी वर्तुळ येऊ नयेत किंवा डोळ्याखालच्या त्वचेला सुज येऊ नये यासाठी आयक्रीमचा वापर करण्याचा सल्ला आलियाने दिलेला आहे. तिच्यामते डोळ्या खालची त्वचा सर्वात जास्त नाजूक असते त्यामुळे तिची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी आयक्रीम लावणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ड्रेयनेस आणि डार्क सर्कल कमी होतात. शिवाय डोळ्यांची सूज आणि आलेला सुरकुत्या देखील कमी व्हायला लागतात.
कॅफिन ड्रॉप
आलिया डोळ्यांखाली कॅफिन ड्रॉप लावते. आलीयाला दिवसभर कॅमेऱ्यासमोर हाय लाईटमध्ये काम करावं लागतं. यामुळे डोळ्यांना सूज येण्याची शक्यता असते, त्यामुळे कॅफिन ड्रॉप वापरते.
मॉश्चरायझरचा वापर
आलियाच्या डेली रुटीनमध्ये मॉश्चरायझरला महत्त्व आहे. जास्त वेळ चेहऱ्यावर मेकअप राहिल्यामुळे त्वचा ड्राय झालेली असते. त्यामुळेच अशा डिहायड्रेटेड त्वचेला पोषण आवश्यक असतं. आलीया सांगते ऑयली स्किनसाठी वॉटर बेस्ट मोस्ट रायझर चांगलं असतं.
(गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? Pregnancy टाळा)
सन्सस्क्रीनचा वापर
स्किन केअर रुटीनेमध्ये सन्सस्क्रीनला ती महत्त्व देते. घराबाहेर किंवा घरात सुद्धा दररोज सनस्क्रीन लावायला हवं असं आलीयाचं मत आहे. सन्सस्क्रीनने त्वचेला पोषक घटक मिळतात. शिवाय सूर्याच्या किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, YouTube Channel