जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहाणाऱ्या मुलींनी 'या' गोष्टींची नेहमी घ्या काळजी, कधीही होणार नाही फसवणूक

हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहाणाऱ्या मुलींनी 'या' गोष्टींची नेहमी घ्या काळजी, कधीही होणार नाही फसवणूक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मुंबई 2 ऑक्टोबर : एक काळ असा होता, जेव्हा मुलींना शिक्षणासाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडण्याची परवनागी नव्हती. परंतू आता बहुतांश स्त्रिया आणि मुली अभ्यास आणि नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर राहतात. बहुतेक मुली वसतिगृहात किंवा पीजीमध्ये राहतात. तसे पाहाता मुलींचे वसतिगृह आणि पीजी सुरक्षित मानले जाते. कारण तेथे सगळ्या सोयी आणि सिक्योरीटी पुरवल्या जातात. पण असं असलं तरी देखील सध्या असे काही प्रकरण समोर आले आहेत, ज्यानंतर हॉस्टेल आणि पीजीमध्ये राहणे सुरक्षित मानले जाऊ शकत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 2 ऑक्टोबर : एक काळ असा होता, जेव्हा मुलींना शिक्षणासाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडण्याची परवनागी नव्हती. परंतू आता बहुतांश स्त्रिया आणि मुली अभ्यास आणि नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर राहतात. बहुतेक मुली वसतिगृहात किंवा पीजीमध्ये राहतात. तसे पाहाता मुलींचे वसतिगृह आणि पीजी सुरक्षित मानले जाते. कारण तेथे सगळ्या सोयी आणि सिक्योरीटी पुरवल्या जातात. पण असं असलं तरी देखील सध्या असे काही प्रकरण समोर आले आहेत, ज्यानंतर हॉस्टेल आणि पीजीमध्ये राहणे सुरक्षित मानले जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही देखील पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहत असाल, तर तुम्हाला काही गोष्टी माहित असायलाच हव्यात. या टीप्स लक्षात ठेवून तुम्ही भविष्यात होणारं नुकसान टाळू शकता. ठिकाण तपासा तुम्ही हॉस्टोलमध्ये राहायला जाणार असाल, तर प्रथम ठिकाण तपासा. केवळ ऑनलाइन माहितीच्या आधारे कुठेही जाऊ नका. तसेच खोलीत कॅमेरा बसवला आहे का? हे पाहण्यासाठी तुमची खोली आणि वॉशरूम नीट तपासा. सगळ्या गोष्टीची नीट तपासणी केल्यानंतर तुम्हाला खात्री पटली, तरच तेथे रुम बुक करा किंवा एडमिशन घ्या. हे वाचा : नोकरीबरोबरच सहज करता येतील हे व्यवसाय; महिन्याला भरपूर रक्कम कमवण्याची संधी लोकांना ओळखायला शिका हॉस्टेल किंवा पीजी मध्ये सर्व अनोळखी लोक असतात, त्यामुळे सहज कोणावरही विश्वास ठेवू नका. जर कोणी आपल्याशी चांगले वागले तर त्याचा अर्थ ती व्यक्ती खरोखरच चांगली आहे असं होत नाही. त्यामुळे समोरील व्यक्तीच्या वागण्यामागचं कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करा. वसतिगृहाचे नियम पाळा वसतिगृहात राहण्यासाठी काही नियम आहेत, ते पाळणे तुमच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी जे तुम्हाला येण्या-जाणाच्या वेळा घालून दिल्या आहेत, त्याचे पालन करा, जर तरी देखील तुम्ही कुठून वेगळ्या ठिकाणाहून गुपचूप बाहेर पडू नका, अशा परिस्थितीत हॉस्टेल वॉर्डन किंवा तुमचा पीजी मालक तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार नाहीत. तसेच अनोळखी ठिकाणी एकट्यानं रात्री बाहेर पडणं धोक्याचं ठरु शकतं. हे वाचा : वाचाल तर वाचाल अन् नवीन शिकाल, ज्ञान संपन्नही व्हाल; जाणून घ्या वाचनाचे काय आहेत फायदे कोणालाही कॉल करू नका कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. लोकांशी बोला आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपला फोन किंवा रूमची चावी कोणालाही देऊ नका. वसतिगृहांमध्ये चोरीच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे आपलं सामान व्यवस्थित ठेवा. आपले सामान आपली स्वतःची जबाबदारी आहे. प्रत्येकाचा नंबर सोबत ठेवा वसतिगृहात रहात असाल तर पोलिस हेल्पलाइन, महिला हेल्पलाइनचा क्रमांक असणे आवश्यक आहे. तुमचा रूम मेट, फ्लोअर मेट आणि पीजी मालक किंवा हॉस्टेल वॉर्डन यांचा नंबरही तुमच्याकडे असावा. कुटुंबातील सदस्यांना रूम मेटबद्दल माहिती द्या जर तुम्ही तुमच्या रूम मेट सोबत कुठेतरी जात असाल, तर आधी घरातील सदस्यांना कळवा आणि रूम मेटचा नंबर देखील द्या जेणेकरून काही अडचण आली तर तुम्ही त्या समस्येतून बाहेर पडू शकाल. तसेच रूममेटच्या पार्श्वभूमीची माहिती घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात