जाहिरात
मराठी बातम्या / मनी / नोकरीबरोबरच सहज करता येतील हे व्यवसाय; महिन्याला भरपूर रक्कम कमवण्याची संधी

नोकरीबरोबरच सहज करता येतील हे व्यवसाय; महिन्याला भरपूर रक्कम कमवण्याची संधी

Business ideas

Business ideas

केवळ 50,000 रुपयांमध्ये कुठला व्यवसाय करू शकतो या संबंधीच्या वेगळ्या व्यवसाय संकल्पना आहेत. त्यांचा विचार केला जाऊ शकतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई,1 ऑक्टोबर : सध्या महागाई प्रचंड वाढली आहे, अशा परिस्थितीत दैनंदिन गरजा भागवताना सर्वसामान्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय. नोकरीच्या माध्यमातून मिळणारी रक्कम तोकडी पडत असून, अतिरिक्त कमाई करणंही गरजेचं झालंय. अतिरिक्त पैसे मिळवायचे असतील तर असे अनेक व्यवसाय आहेत ज्याद्वारे चांगली कमाई केली जाऊ शकते. विशेष म्हणजे यासाठी गुंतवणूकही अत्यंत कमी लागते. जसजशी कमाई वाढते तसं तुम्ही या व्यवसायाचा विस्तारही करू शकता. केवळ 50,000 रुपयांमध्ये कुठला व्यवसाय करू शकतो या संबंधीच्या वेगळ्या व्यवसाय संकल्पना आहेत. त्यांचा विचार केला जाऊ शकतो. उदबत्ती निर्मितीचा व्यवसाय उदबत्ती बनवण्याचा व्यवसाय आपण घरीच सुरू करू शकतो. उदबत्ती बनवण्यासाठी मिक्सर, ड्रायर मशीन आणि मेन प्रॉडक्ट मशीन अशा विविध मशीन्सचा वापर केला जातो. भारतात उदबत्ती बनवण्याच्या मशीनची किंमत 35,000 रुपयांपासून ते 1,75,000 रुपयांपर्यंत आहे. या मशीनमध्ये दर मिनिटाला 150 ते 200 उदबत्ती तयार होऊ शकतात. जर हातानी उदबत्ती बनवणार असाल तर 15,000 रुपयाच्या भांडवलापासून तुम्ही सुरूवात करू शकता. कच्चा माल उदबत्ती बनवण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता भासते. यात गम पावडर, चारकोल पावडर, बांबू, नर्गिस पावडर, सुवासिक तेल, पाणी, सेंट, फुलांच्या पाकळ्या, चंदनाचं लाकूड, जिलेटिन पेपर, शॉ डस्ट, पॅकिंग मटेरियल आदी वस्तू असणं गरजेचं आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी तुम्ही बाजारातील चांगल्या पुरवठादारांशी संपर्क साधू शकता. हेही वाचा - 5G Launch In India : 5G नेटवर्कमुळे शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? ****लोणचं बनवण्याचा व्यवसाय लोणचं बनवण्याचा व्यवसाय आपण घरबसल्या ठिकाणी सुरू करू शकतो. यात सुरुवातीला तुम्हाला 10,000 रुपये गुंतवणुकीची आवश्यकता असते. यात महिन्याकाठी कमीतकमी आपण 30,000 ते 35,000 रुपये आणि वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई करू शकतो. ऑनलाइन, ठोक व किरकोळ बाजारातही आपण लोणच्याची विक्री करू शकतो. सरकारकडून मिळतेय मदत कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. याचा फायदा घेऊन व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. या व्यवसायाला सुरू करण्यासाठी 900 चौरस फुटांची जागा आवश्यक आहे. लोणचं तयार करणं, लोणचं वाळवणं, त्याच्या पॅकिंगसाठी मोकळी जागा असणं आवश्यक आहे. बराच काळ लोणचं खराब होऊ नये, म्हणून स्वच्छता ठेवली जाणं अत्यंत आवश्यक असतं. जेवणाचा डबा द्या हा व्यवसाय महिला घरबसल्या सुरू करू शकतात. या व्यवसायातून उत्तम नफा मिळू शकतो. सुरूवातीला 8,000 ते 10,000 रुपयांपासून तुम्ही या व्यवसायाची सुरूवात करू शकता. तुम्ही केलेला स्वयंपाक ग्राहकांना पसंत पडला तर दरमहिन्याला तुम्ही 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. बहुतांश महिला सध्या घरातूनच हा व्यवसाय करत उत्तम पैसे कमवत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून याचं मार्केटिंग अगदी सोप्या पद्धतीनं केलं जाऊ शकतं. फेसबुक व इन्स्टाग्रामवर याचं पेजही तुम्ही बनवू शकता. इथं चांगला प्रतिसादही मिळतो. तर मग विचार करा आणि व्यवसाय सुरू करण्याची करा तयारी.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात