मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वाचाल तर वाचाल अन् नवीन शिकाल, ज्ञान संपन्नही व्हाल; जाणून घ्या वाचनाचे काय आहेत फायदे

वाचाल तर वाचाल अन् नवीन शिकाल, ज्ञान संपन्नही व्हाल; जाणून घ्या वाचनाचे काय आहेत फायदे

Reading habit

Reading habit

पुस्तकं वाचण्याचा छंद असलेल्या व्यक्तीला दैनंदिन आयुष्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नेहमी मार्ग सापडत असतो. त्यामुळे भरपूर वाचन करायला हवं, असा सल्लाही ज्येष्ठांकडून दिला जातो. वाचनाचे काय आहेत जाणून घ्या

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,1 ऑक्टोबर : ‘वाचाल तर वाचाल’ हा अमूल्य असा संदेश आहे. वाचन करणारी व्यक्ती अधिक प्रगल्भ व वैचारिक कक्षाही रुंदावलेली असते. एकूणच व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने वाचन अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. पुस्तकं वाचण्याची सवय चांगली आहे. त्याचे फायदेही अनेक आहेत. पुस्तकं वाचण्याचा छंद असलेल्या व्यक्तीला दैनंदिन आयुष्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नेहमी मार्ग सापडत असतो. त्यामुळे भरपूर वाचन करायला हवं, असा सल्लाही ज्येष्ठांकडून दिला जातो. पुस्तकं वाचण्याच्या फायद्यांबद्दल ‘एनडीटीव्ही इंडिया हिंदी’नं वृत्त दिलंय.

समाजात मोबाइल, इंटरनेटचं प्रस्थ वाढत असताना अनेक लोकांनी पुस्तकं वाचण्याच्या सवयीला तिलांजली दिली आहे. सध्या खूप कमी लोक पुस्तकं वाचण्याचा छंद जोपासत आहेत. जेव्हा मोबाइल, कॉम्प्युटर, टॅबलेट आले नव्हते तेव्हा वेळ सत्कारणी घालवण्यासाठी लोकं पुस्तकं वाचायचे. पण आज मात्र लोक या इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या आहारी गेले आहेत. पुस्तकं वाचणं ही अत्यंत चांगली सवय असून, यातून आपल्या जीवनात अनेक बदल घडू शकतात. प्रत्येक व्यक्तीनं आज पुस्तकं वाचण्याची सवय लावून घ्यायला हवी. व्यक्तिमत्व विकासात पुस्तकं महत्त्वाची भूमिका बजावतात. याचे अनेक फायदे आहेत. त्यातील काहींवर आपण विचार करायला हवा.

हेही वाचा - Night Shift मध्ये काम करत असाल तर अलर्ट राहा! कायम लक्षात ठेवा या 8 गोष्टी

पुस्तक वाचणानं मेंदू सक्रिय राहतो

तज्ज्ञांच्या मते, पुस्तकं वाचण्यानं मेंदू सतत सक्रिय राहत असतो. वाचनाच्या सवयीतून एकप्रकारे मेंदूचा व्यायाम होतो. शिवाय स्मरणशक्ती व मेंदूच्या क्षमतेत वाढ होते. या कारणामुळे सर्वांनी पुस्तकं वाचण्याची सवय लावून घ्यायला हवी.

संवाद कौशल्यात पडेल भर

दररोज पुस्तकं वाचण्याची सवय असेल तर तुमच्या ज्ञानात सतत भर पडत असते. शिवाय कुठल्याही विषय किंवा मुद्द्यांबाबत तुमच्याकडे इतरांपेक्षा अधिक माहिती असते, शब्दसंग्रहही सुधारतो. दररोज नवनवीन शब्द शिकायला मिळतील. तुमच्या बोलण्याची पद्धतही सुधारू शकते.

फोकस वाढवण्यासाठी फायदेशीर

फोकस म्हणजे एकाग्रता वाढवण्यासाठी पुस्तक वाचण्याची सवय लावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक जण कामात एकाग्रता साधू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना लक्ष्य गाठणं मुश्किल होतं. तुम्हाला एकाग्रता वाढवायची असेल, तर तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय असणं फार महत्त्वाचं आहे.

तणावमुक्त राहण्यासाठी होईल मदत

धकाधकीच्या जीवनात ताणतणाव खूप वाढलेला आहे. अशा परिस्थितीत मेंदूला शांत ठेऊन तणावमुक्त जीवन जगण्याची गरज निर्माण झाली आहे. जर तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय असेल तर तुमच्या जीवनात तणाव कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात. पुस्तकं वाचल्यानं आपण दररोज नवनवीन गोष्टी शिकत राहतो. यामुळे आपला मेंदू तणावापासून दूर राहण्यास मदत होते. आयुष्यात तणावमुक्त राहायचं असल्यास लवकर पुस्तकं वाचण्याची सवय लावून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

First published:

Tags: Lifestyle