मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भांगेची चटणी माहिती आहे? पाहा कशी करतात; पावसाळ्यात थंडी वाजल्यावर नक्की खा

भांगेची चटणी माहिती आहे? पाहा कशी करतात; पावसाळ्यात थंडी वाजल्यावर नक्की खा

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) सगळ्या घरांमध्ये भांगेची चटणी बनवली जाते. तुम्हीही पावसाळ्यात भज्यांबरोबर ही चटणी खाऊन बघा.

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) सगळ्या घरांमध्ये भांगेची चटणी बनवली जाते. तुम्हीही पावसाळ्यात भज्यांबरोबर ही चटणी खाऊन बघा.

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) सगळ्या घरांमध्ये भांगेची चटणी बनवली जाते. तुम्हीही पावसाळ्यात भज्यांबरोबर ही चटणी खाऊन बघा.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली 13 जुलै : भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशांमध्ये खाद्यसंस्कृती (Food Culture of India) देखील तितकीच विविध प्रकारची आहे. प्रत्येक राज्यात त्यात्या जिल्ह्यात पदार्थ बनवण्याची पद्धत (Cooking Method) वेगळी आहे. आपल्या देशात वातवरण आणि तापमानही वेगवेगळ असतं. त्यामुळे काही मौसमात(season)एखाद्या भागात खास पदार्थ खाल्लेच जातात. महाराष्ट्रात इतक्या पद्धतीच जेवण(Food Of Maharashtra)बनतं. महाराष्ट्र प्रमाणेच इतर राज्यात देखील वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवले जातात.

निसर्गाने समृद्ध असलेल्या उत्तराखंडही(Uttarakhand)स्वतःची एक वेगळी खाद्यसंस्कृती जोपासून आहे. तिथलीच एक खासियत म्हणजे भांगेची चटणी (Bhang Chutney). खरंतर भांग म्हणजे आपल्याला होळीच्या दिवशी (Holy Festival)प्यायलं जाणारं पेय इतकंच आठवू शकतं. मात्र त्या भांगेपासून एक चटणी देखील बनते हे माहिती आहे का?

(Amazonवर या तारखेपासून स्वस्तात करा Shopping,स्मार्टफोनसह हजारो प्रोडक्ट्सवर सूट)

मात्र या भांगेचा चटणीमध्ये कोणतीही नशा नसते. हा एक पारंपारिक पद्धतीचा पदार्थ आहे. तिथे होळीच्या दिवशी ही खास चटणी बनवली जाते. भजी बरोबर ही चटणी आवडीने खाल्ली जाते.

चटणी बनवण्याचं साहित्य

50 ग्रॅम भांगेच्या बिया 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 4 छोटे चमचे लिंबाचा रस, 3 छोटे चमचे कोथिंबीर, 3 छोटे चमचे पुदिना, अर्धा छोटा चमचा मीठ, 2 ते 3 लाल मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे.

(केसांसाठी सगळे उपाय करून झाले? ‘या’ Home Remedies करूनच पाहा; केस वाढतील तिपटीने)

चटणी बनवण्याची पद्धत

भांगेचे दाणे खरपूस भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करा. तयार झालेली पावडर चाळून घ्या. त्यानंतर उर्वरित साहित्य या पावडरमध्ये टाकून मिक्सरमधून चटणी तयार करा. यात लिंबाचा रस घाला.

होळीच्या दिवशी खास पद्धतीने बनवली जाणारी ही चटणी भात,चपाती,पराठे यांच्याबरोबर देखील आवडीने खाल्ली जाते. भागं उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळेच उत्तराखंड सारख्या अतिशय थंडी असणाऱ्या भागांमध्ये आवडीने ही चटणी खाल्ली जाते. तुम्हाला ही चटणी खायची असेल तर, पावासाळ्यात वातावरण थंड असताना किंवा थंडीच्या मौसमात खा. यासंदर्भात झीने माहिती दिली आहे.

(लग्न राहिलं बाजूला, नवरा-नवरीने आधी जेवणावर मारला ताव; बकाबक खाताना VIDEO)

भांगेच्या चटणीचे फायदे

भांगेच्या चटणीचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. भांगेच्या बियांमध्ये प्रोटीन फायबर,ओमेगा-3 ओमेगा-6 फॅटी ऍसिड असतं. यामुळे त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं. या बियांमध्ये ऍन्टीऑक्सिडंट असतं. यामुळे हृदय निरोगी राहतं सांधेदुखी ही कमी होतं. भांगेच्या बियांमध्ये प्रोटीन आणि फायबर असतं ज्यामुळे भूक देखील कमी लागते.

First published:

Tags: Food, Tasty food, Uttarakhand floods