• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • केसांसाठी सगळे उपाय करून झाले? ‘या’ Home Remedies करूनच पाहा; केस वाढतील तिपटीने

केसांसाठी सगळे उपाय करून झाले? ‘या’ Home Remedies करूनच पाहा; केस वाढतील तिपटीने

निरोगी आणि सुंदर करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही वस्तू वापरता येतात.

निरोगी आणि सुंदर करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही वस्तू वापरता येतात.

केस वाढवण्यासाठी वरवच्या काळजीपेक्षा शरीरामधून पोषण मिळायला हवं.

 • Share this:
  नवी दिल्ली ,09 जुलै: सुंदर, लांब आणि निरोगी केस प्रत्येकाचं स्वप्न (Dream for Healthy Hair) असतं. आपल्या केसांचं आरोग्य आपला आहार आणि लाईफस्टाइलवर (Diet & Lifestyle) अवलंबून असतं. यालाच सुंदर केसांचं रहस्य (Secret) देखील म्हटलं जाऊ शकतं. या व्यतिरिक्त अनुवांशिक (Geneticगोष्टीवरही चांगले केसं अवलंबून असतात. बरीच औषधं, तेल, शॅम्पू वापरुन केसांचं आरोग्यही (Hair Health) चांगलं ठेवता येऊ शकतं. पण काही रासायनिक उत्पादनांचा (Chemical Product) वापराचा केसांच्या गुणवत्तेवर निगेटिव्ह इफेक्ट (Negative Effect) करतात. त्यामुळे आपल्या केसांना निरोगी आणि सुंदर ठेवायचं असेल तर, ही माहिती वाचा. केसांच आरोग्य चांगलं, निरोगी आणि सुंदर करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थ वापरता येतात. (सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; पावसाळ्यात हेल्दी ठेवेल असा आहार) कोरफडचा रस कोरफड त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. हे प्रोटीओलाइटिक एंजाइमनने समृद्ध आहे. ज्यामुळे मृत पेशी आणि केसांच्या त्वचेला मजबूत करतं. कोरफडचा रस घेतल्याने केसांचं आरोग्य हळूहळू चांगलं होतं आणि वेगाने वाढू लागतात. यासाठी दररोज सकाळी 1 ग्लास एलोवेरा ज्युस प्या. पहा केसांवर चांगला परिणाम होईल. (‘नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल’ किती असते? कसा ओळखायचा धोका?) केळं आणि बदाम स्मूदी केळी आणि बदाम दोन्ही केसांसाठी फायदेशीर आहेत. बदामात प्रोटिन, व्हिटॅमीन्स आणि झिंक सारखे खनिज पदार्थ असतात. जे केसांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण घटक मानले जातात. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई केराटिनची निर्मिती वाढवून खराब झालेल्या केसांच्या दुरुस्तीसाठी खूप उपयुक्त ठरतं. केळ्यांमध्ये कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे केस निरोगी आणि मजबूत बनतात. 1 ग्लास दुधात बदाम, केळी, दालचिनीची पूड आणि मध मिसळा आणि मिक्सरमध्ये बारीक करा. रोज ही स्मूदी प्यायला सुरूवात करा. (तुम्हाला माहिती आहे का चॉकलेट खाण्याचे हे फायदे? नाही, तर पहा PHOTOS) बार्ली वॉटर बार्लीमध्ये आयर्न आणि कॉपर असतं. ज्यामुळे रक्तातल्या लाल रक्तपेशींचं उत्पादन वाढतं. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ वेगाने होते. बार्ली म्हणजे जवाच्या पाण्यात मीठ घालून उकळवा. त्यात लिंबू आणि मध मिसळा आणि थंड झाल्यावर प्या.
  Published by:News18 Desk
  First published: