• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • या शहरात प्रत्येक तरुणाला असतात 3 Girlfriends, मुलीच करतात खर्च

या शहरात प्रत्येक तरुणाला असतात 3 Girlfriends, मुलीच करतात खर्च

जगात असं एक (City where every youth has 3 girlfriends) शहर आहे, जिथं प्रत्येक तरुणाला तीन गर्लफ्रेंड्स असतात.

 • Share this:
  बिजिंग, 8 नोव्हेंबर: जगात असं एक (City where every youth has 3 girlfriends) शहर आहे, जिथं प्रत्येक तरुणाला तीन गर्लफ्रेंड्स असतात. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांचं नातं हे प्रत्येक देशात (Relationship between boyfriend and girlfriend) पाहायला मिळतं. तारुण्यात एकमेकांवर जडणारं (love and relationship) प्रेम आणि निर्माण होणारे संबंध हे सारखेच असले, तरी परिस्थितीनुसार व्यावहारिक गोष्टीत फरक पडतो. जगातील अनेक भागांत मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक तरुणांना त्यांचा जोडीदार मिळणं कठीण होतं. मात्र जगात असं एक शहर आहे, जिथली परिस्थिती यापेक्षा उलटी आहे. डॉंगुआन शहराची खासियत चीनमधील डॉंगुआन शहराची एक खासियत आहे. या शहरात असणाऱ्या मुलांची संख्या मुलींच्या तुलनेत फारच कमी आहे. दर 100 मुलांमागे या शहरात केवळ 89 मुली आहेत. त्यामुळे इथल्या प्रत्येक तरुणाला एकापेक्षा अधिक गर्लफ्रेंड असतात. साधारणतः एखाद्या तरुणाला नोकरी मिळाल्यानंतर मग गर्लफ्रेंड मिळते. अऩेकांना तर नोकरी मिळूनही गर्लफ्रेंड मिळत नाही. मात्र या शहरात नोकरी मिळण्यापेक्षाही गर्लफ्रेंड मिळणं सोपं जातं. एक गर्लफ्रेंड असणं हा अपमान केवळ एकच गर्लफ्रेंड असणं हा या शहरात अपमान मानला जातो. कमीत कमी 2 ते 3 गर्लफ्रेंड असणारे अनेक तरुणात या शहरात दिसतात. ज्याला केवळ एकच गर्लफ्रेंड आहे, त्याला इतर तरुण चिडवताना दिसतात. हे वाचा- थंडीत औषधासारखं काम करतं लसूण, जाणून घ्या त्याचे फायदे मुलीच करतात खर्च या शहरात मुलांचं प्रमाण कमी असल्यामुळे अनेक तरुणींना बॉयफ्रेंड मिळत नाही. त्यामुळे आपला बॉयफ्रेंड आपल्याला सोडून जाऊ नये, यासाठी मुली काळजी घेताना दिसतात. हे शहर वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीसाठी ओळखलं जातं. इथल्या फॅक्टरीत काम करणारा बहुतांश कामगार वर्गदेखील महिलांचा आहे. पुरुषांची संख्या कमी असल्यामुळे या शहरात अनेक तरुणींचं लग्न होत नाही. या अऩोख्या गावाची केवळ चीनमध्येच नव्हे, तर जगभर चर्चा रंगते.
  Published by:desk news
  First published: