मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Radish Health Benefits: हृदय विकारांसह BP सुद्धा राहील नियंत्रणात; हिवाळ्यात मुळा खाण्याचे इतके आहेत फायदे

Radish Health Benefits: हृदय विकारांसह BP सुद्धा राहील नियंत्रणात; हिवाळ्यात मुळा खाण्याचे इतके आहेत फायदे

हिवाळ्यात मुळा (Radish) खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. एक चांगली भाजीच नव्हे तर त्यामध्ये असलेले घटक आपली प्रतिकारशक्ती, रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांसाठीही फायदेशीर आहेत. बहुतेक लोकांना मुळा सलाडमध्ये खायला आवडतो.

हिवाळ्यात मुळा (Radish) खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. एक चांगली भाजीच नव्हे तर त्यामध्ये असलेले घटक आपली प्रतिकारशक्ती, रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांसाठीही फायदेशीर आहेत. बहुतेक लोकांना मुळा सलाडमध्ये खायला आवडतो.

हिवाळ्यात मुळा (Radish) खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. एक चांगली भाजीच नव्हे तर त्यामध्ये असलेले घटक आपली प्रतिकारशक्ती, रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांसाठीही फायदेशीर आहेत. बहुतेक लोकांना मुळा सलाडमध्ये खायला आवडतो.

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : हिवाळ्यात मुळा (Radish) खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. एक चांगली भाजीच नव्हे तर त्यामध्ये असलेले घटक आपली प्रतिकारशक्ती, रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांसाठीही फायदेशीर आहेत. बहुतेक लोकांना मुळा सलाडमध्ये खायला आवडतो. आज तकमध्ये हिवाळ्यात (Radish in Winter session) रोज मुळा का खावा आणि त्याचा शरीराला कसा (Radish Health Benefits) फायदा होतो याची माहिती दिली आहे.

रोगप्रतिकारक शक्ती -

मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते, ज्यामुळं थंडीत सर्दी-खोकल्याच्या त्रासापासून संरक्षण होते. मुळा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचेही काम करते. शरीरातील सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी आणि वृद्धत्व रोखण्यासाठी देखील मुळा उपयुक्त आहे.

रक्तदाब नियंत्रण -

मुळ्यातून शरीराला पोटॅशियमचा पुरवठा होतो, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. विशेषत: जर तुम्हाला हायपरटेन्शनची समस्या असेल तर तुमच्या आहारात मुळ्याचा अवश्य समावेश करा. आयुर्वेदानुसार मुळ्यात रक्तावर थंडावा देण्याचा प्रभाव असतो.

हृदयाचे आजार -

मुळा अँथोसायनिन्सचा चांगला स्रोत मानला जातो, ज्यामुळे आपले हृदय योग्यरित्या कार्य करू शकते. रोज मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. मुळा फॉलिक अॅसिड आणि फ्लेव्होनॉइड्सने देखील समृद्ध आहे. मुळा रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा देखील वाढवतो.

हे वाचा - बाईकच्या हँडलमुळे तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला जबर मार; मेडिकल जर्नलमध्ये केस दाखल

फायबर -

मुळ्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. जे लोक रोज सलाडच्या रूपात मुळा खातात त्यांच्या शरीरात फायबरची कमतरता कधीच नसते. फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित काम करते. याशिवाय मुळा यकृत आणि गाल मूत्राशयाचे रक्षण करते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

जर तुम्हाला ग्लोइंग स्किन हवी असेल तर रोज मुळ्याचा रस प्या. त्यात व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरस असते. याशिवाय कोरडी त्वचा आणि मुरुमांपासूनही सुटका मिळते. केसांमध्ये लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते आणि केस मुळापासून मजबूत होतात.

हे वाचा - Jandhan अकाउंट घरबसल्या करा Aadhaar शी लिंक, अन्यथा होईल 1.30 लाखांचे नुकसान

पोषक तत्वे-

लाल मुळा व्हिटॅमिन ई, ए, सी, बी 6 आणि के नं समृद्ध आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह आणि मँगनीज मुबलक प्रमाणात असतात. ही सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला आतून निरोगी बनवतात.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Winter session