मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कंडोमची गरजच पडणार नाही; तुमच्या शरीरातील अँटिबॉडीच रोखणार प्रेग्नन्सी

कंडोमची गरजच पडणार नाही; तुमच्या शरीरातील अँटिबॉडीच रोखणार प्रेग्नन्सी

मानवी शरीरात आढळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीजचा वापर करून गर्भनिरोधक औषधाची (Contraceptive) निर्मिती करता येऊ शकते.

मानवी शरीरात आढळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीजचा वापर करून गर्भनिरोधक औषधाची (Contraceptive) निर्मिती करता येऊ शकते.

मानवी शरीरात आढळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीजचा वापर करून गर्भनिरोधक औषधाची (Contraceptive) निर्मिती करता येऊ शकते.

    मुंबई, 16 ऑगस्ट : गेल्या काही काळात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अँटिबॉडी (Antibody) हा शब्द सातत्याने तुमच्या कानावर पडतो आहे. अँटिबॉडी अर्थात प्रतिपिंडं. कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर किंवा कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज निर्माण होतात आणि त्या कोरोनाच्या विषाणूला प्रतिकार करतात. शरीराला अनावश्यक असलेल्या किंवा घातक ठरू शकतील, अशा गोष्टींना विरोध करण्याचं काम अँटीबॉडीज करत असतात. आता मानवी शरीरातील अशाच अँटिबॉडीजपासून लवकरच गर्भनिरोधक (Contraceptive) तयार होणार आहे.

    मानवी शरीरात आढळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीजचा वापर करून गर्भनिरोधक (Sperm hunting antibody) औषधाची निर्मिती करण्याबाबत संशोधन सुरू आहे. मेंढीवरच्या (Sheep) संशोधनात हे औषध उपयुक्त ठरत असल्याचंही आढळून आलं आहे. त्यामुळे त्या दिशेने पुढच्या संशोधनाला गती मिळणार आहे.

    सर्व प्रकारच्या सजीवांच्या नर (Male) आणि माद्यांच्या (Female) शरीरात स्पर्म अँटीबॉडीज (Sperm Antibodies) असतात. स्पर्म अँटीबॉडीज म्हणजे शुक्राणूला विरोध करणारी प्रतिपिंडं. नर म्हणजेच पुरुषांच्या शरीरातल्या स्पर्म अँटीबॉडीज शरीराच्या अन्य अवयवांमध्ये स्पर्म्सना (Sperm) प्रवेश करू देत नाहीत. मादी म्हणजेच स्त्रीच्या शरीरात असलेल्या स्पर्म अँटीबॉडीज शरीरात आलेल्या स्पर्मला घुसखोर आणि घातक घटक समजतात. त्यामुळे स्त्रीच्या शरीरात प्रवेश केलेल्या पुरुषाच्या शुक्राणूंचं त्या अँटीबॉडीजबरोबर एकप्रकारचं युद्ध होतं. सर्वांत आरोग्यपूर्ण आणि शक्तिशाली असलेला एखादा शुक्राणूच अँटीबॉडीविरुद्धच्या युद्धात जिंकू शकतो. तो शुक्राणू बीजांडकोशात प्रवेश करू शकतो आणि स्त्रीला गर्भधारणा होते.

    हे वाचा - ‘या’ गोष्टींकडे लक्ष असू द्या! लगेच पकडा जोडीदाराने केलेली फसवणूक

    मानवी शरीरात नैसर्गिकरीत्या असलेल्या या स्पर्म अँटीबॉडीजचा वापर गर्भनिरोधक औषधनिर्मितीसाठी करता येऊ शकेल, अशा विचाराने शास्त्रज्ञांनी संशोधन हाती घेतलं. सायन्स ट्रान्स्लेशनल मेडिसिन या जर्नलमध्ये अलीकडेच या संशोधनाबद्दलचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

    यासाठी शास्त्रज्ञांनी काही जास्तीचे अँटीजेन (Antigen) बांधून ठेवू शकतील, अशा फ्रॅगमेंट्सचा वापर केला. त्यामुळे स्पर्मशी युद्ध करणाऱ्या अँटीबॉडीजची क्षमता 10 पटींनी वाढली. या अँटीबॉडीजचा प्रयोग शास्त्रज्ञांनी मेंढीच्या योनीमध्ये केला. त्यामुळे मेंढीच्या शरीरातल्या स्पर्मरोधक अँटीबॉडीज 99.9 टक्के प्रभावी ठरल्या.

    शास्त्रज्ञांनी असं म्हटलं आहे, की आमचं हे संशोधन अजूनही प्रायोगिक पातळीवर असून, त्यामुळे गर्भधारणा 100 टक्के थांबवता येईलच याची खात्री अद्याप तरी देता येत नाही; मात्र भविष्यात हे तंत्र प्रभावीपणे वापरता येऊ शकतं. हे तंत्र सुरक्षित आहे. कारण त्यात कोणताही बाह्य घटक वापरलेला नाही. या अँटीबॉडीज माणसाच्या शरीरात आधीच अस्तित्वात असतात आणि तंत्राद्वारे त्यांची केवळ क्षमता वाढवली जात आहे. सध्या यांची चाचणी केवळ मेंढ्यांमध्येच झाली असून, माणसांमध्ये त्याची क्लिनिकल ट्रायल झालेली नाही; मात्र यातून आशेचा किरण शास्त्रज्ञांना दिसला आहे, एवढं नक्की.

    हे वाचा - प्रेग्नन्सीत खाल्ला जाणारा हा पदार्थ महिलांच्या लैंगिक समस्यांवरही उपयुक्त

    हॉर्मोनवर आधारित गर्भनिरोधक औषधं जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात; मात्र त्यांचे साइड इफेक्ट्स (Side Effects) मोठ्या प्रमाणावर असतात. उलट्या, डोकं जड होणं, ढेकर येणं, मूड बदलणं, अर्धशिशी आणि काही वेळा रक्ताच्या गुठळ्या होणं असे वेगवेगळ्या प्रकारचे साइड इफेक्ट्स ही औषधं घेणाऱ्यांना सोसावे लागतात. अँटीबॉडी आधारित औषध तयार झाल्यास हे त्रास होणार नाहीत, असं शास्त्रज्ञांना वाटतं.

    याशिवाय काही अमेरिकी शास्त्रज्ञांनीही या प्रकारचा एक प्रयोग अलीकडेच केला आहे. अँटीबॉडीजच्या माध्यमातून त्यांनी शरीरातले स्पर्म्स एकाच ठिकाणी गोळा करण्याचं तंत्र विकसित केलं होतं. ते एकाच ठिकाणी गोळा झाले, तर त्यांची प्रजननक्षमता संपते आणि ते निष्क्रिय होतात.

    First published:
    top videos

      Tags: Couple, Lifestyle, Pregnancy