मुंबई, 06 जुलै : जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येण्यासाठी वास्तूशास्त्रातील काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. असे मानले जाते की, आपल्या घराची चुकीची वास्तू कुटुंबाचे सुख-समाधान-शांती हरण करते. त्यामुळे वास्तूशास्त्रामध्ये असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याची वेळीच काळजी घेतल्यास आपण आनंदी जीवन जगू शकतो. घरामध्ये असलेले वास्तुदोष कोणत्याही व्यक्तीकडे धन-पैसा राहू देत नाहीत. लाख प्रयत्न करूनही पैशांचे गणित जमत नसेल तर घरातील या तीन स्थानांची विशेष काळजी घेणे आवश्यक (Vastu Tips For Home ) आहे. याविषयी झीन्यूज ने माहिती दिली आहे. घराची उत्तर दिशा - वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला विशेष महत्त्व आहे. घराच्या उत्तर दिशेला कुबेर देवता किंवा धनाची देवता असते, असे मानले जाते. त्यामुळे ही बाजू नेहमी स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते. आर्थिक कामांसाठी ही दिशा अतिशय शुभ मानली जाते. वास्तु तज्ज्ञांच्या मते, घराची ही दिशा अस्वच्छ राहिल्यास धनहानी होते आणि हळूहळू माणूस गरीब होतो. टॉयलेट- आज-काल लोक घरातील टॉयलेट आलिशान बनवतात, पण ते वास्तूनुसार बनवायला विसरतात किंवा त्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत या गोष्टी व्यक्तीच्या खिशाला भारी पडू शकतात. वास्तूमध्ये दक्षिण आणि पश्चिम दिशांना शौचालयासाठी सर्वोत्तम मानले जाते. घरामध्ये ईशान्य दिशेला शौचालय बनवलेले असेल तर त्या व्यक्तीला पैशाच्या तंगीचा सामना करावा लागतो. तसेच साठवलेले पैसेही संपू लागतात. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम पाण्याची टाकी- घरामध्ये ठेवलेली पाण्याची टाकी देखील वास्तुशास्त्राच्या दिशेनुसार ठेवावी, हे फार कमी लोकांना माहिती असेल. घराची टाकी आग्नेय दिशेला ठेवणे शुभ मानले जात नाही. ही दिशा अग्नी दिशा मानली जाते आणि या दिशेला पाण्याचे टाके ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.