मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /खरेदी करताना ताजे मासे कसे ओळखायचे? वाचा खास टिप्स

खरेदी करताना ताजे मासे कसे ओळखायचे? वाचा खास टिप्स

ज्यांना मासेखरेदीचा अनुभव नसेल आणि मासेखरेदी करायची असेल, तर त्यांना मार्गदर्शक ठरेल अशी माहिती

ज्यांना मासेखरेदीचा अनुभव नसेल आणि मासेखरेदी करायची असेल, तर त्यांना मार्गदर्शक ठरेल अशी माहिती

ज्यांना मासेखरेदीचा अनुभव नसेल आणि मासेखरेदी करायची असेल, तर त्यांना मार्गदर्शक ठरेल अशी माहिती

    मुंबई, 24 ऑगस्ट : नारळी पौर्णिमा (Narali Purnima) नुकतीच झाली आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मच्छिमार (Fishermen) बांधव मासेमारीच्या हंगामाला सुरुवात करतात. पावसाळ्यात नारळी पौर्णिमेपर्यंतच्या साधारण तीन महिन्यांच्या कालावधीत मासेमारी केली जात नाही. कारण त्या कालावधीत समुद्राला उधाण असतं, तसंच माशांच्या पुनरुत्पादनाचा हंगाम असतो. नारळी पौर्णिमेपासून मच्छिमार खोल समुद्रात जाऊ लागले, की बाजारात ताजी मासळी उपलब्ध होऊ लागते. ताजी फडफडीत मासळी (Fish) एवढं नुसतं म्हटलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे हौशीने मासे खाणारी मंडळी माशांच्या खरेदीलाही अगदी हौशीने जातात. कारण मासे खरेदी करताना नीट पाहून घेतले नाहीत आणि शिळे मासे पदरात पडले, तर विरस होतो.

    खरेदी करताना ताजे मासे कसे ओळखायचे याची माहिती नेहमी मासे खरेदी करणाऱ्यांना असतेच; पण ज्यांना मासेखरेदीचा अनुभव नसेल आणि मासेखरेदी करायची असेल, तर त्यांना मार्गदर्शक ठरेल अशी माहिती नेस्ले फॅमिली डॉट कॉम या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    ताजेपणा हा आयुष्यात प्रत्येक गोष्टीत आवश्यक असतो. खाण्याच्या पदार्थांच्या बाबतीत तर तो अत्यावश्यकच असतो. मग मासे तरी त्याला अपवाद कसे असणार? मासे आणि त्यांच्याशी संबंधित कोणत्याही रेसिपीज करायच्या झाल्या, तर सर्वांत महत्त्वाचा असतो तो त्यांचा ताजेपणा. मासे जितके ताजे, तितकी त्यांच्यापासून बनवलेल्या पदार्थाची चव सुंदर. शक्यतो मासे ज्या दिवशी खरेदी केले जातील, त्याच दिवशी त्यांचे पदार्थ बनवून खाणं श्रेयस्कर असतं. कारण ताजेपणातून मिळणारी चव अन्य कशामुळेच येत नसते. त्याच दिवशी पदार्थ करणं शक्य नसेल, तर मासे वॅक्स पेपरमध्ये गुंडाळून किंवा एखाद्या डिशमध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवावेत. मासे एकदम ताजे असतील, तर ते फ्रीजमध्ये एक-दोन दिवस ठेवता येऊ शकतात. फ्रोझन फिश असतील, तर फ्रीझरमध्ये सहा महिन्यांपर्यंतही ठेवता येतात.

    हे 7 पदार्थ आहेत अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स पॉवर हाउस; आजारापणापासून बचावासाठी रोज घ्या

    ताजे मासे ओळखण्याच्या टिप्स

    - सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताज्या माशांना अजिबात घाणेरडा वास येत नाही. एक प्रकारचा ओलसर आणि समुद्राच्या ताजेपणाचा गंध ताज्या माशांना येत असतो. त्यामुळे माशांना विचित्र किंवा घाणेरडा वास येत असेल, तर ते शिळे मासे असण्याची दाट शक्यता असते. असे मासे खरेदी करू नयेत.

    - माशांवर कोणत्या जखमा नाहीयेत ना हे पाहून घ्यावं. गडद लाल रंगाचे ठिपके माशांच्या शरीरावर दिसत असतील, तर त्या जखमा होत. मासे योग्य पद्धतीने हाताळले गेले नाहीत, तर अशा जखमा होतात. असे मासे खाण्यायोग्य असतात; पण त्यांचा दर्जा फार उत्तम नसतो.

    - माशांचे डोळे स्वच्छ आणि चांगले असले पाहिजेत. त्यांचे डोळे दुधाळ किंवा गढूळ दिसत असतील, तर ते मासे किमान पाच दिवसांपूर्वी काढलेले आहेत, असं समजावं. मासे शिळे झाल्यानंतरच त्यांचे डोळे असे दिसतात.

    - ताज्या माशाचं मांस घट्ट आणि रबरासारखं असतं. मासा बाहेरून बोटाने दाबला, तर बोट काढल्यावर दाबलेल्या जागेवरचं मांस पुन्हा मूळ जागेवर येतं, तिथे खड्डा तयार होत नाही. मासा शिळा होऊ लागल्यावर तो मऊ व्हायला लागतो. त्याच्या शरीरावर दाबलेल्या ठिकाणी खड्डा दिसतो. असे मासे खरेदी करू नयेत.

    आवडता पिझ्झा खाण्यापूर्वी हे वाचा; 1 त्रिकोण करतो तुमच्या आयुष्याची 8 मिनिटं कमी

    - माशांच्या कल्ल्यांची आतली बाजू ओलसर आणि गडद लाल रंगाची असली पाहिजे. कल्ले गुलाबी किंवा ब्राउनिश ग्रे रंगाचे असतील, तर तो मासा अयोग्य पद्धतीने हाताळला गेलेला असू शकतो किंवा शिळा असू शकतो. कल्ले स्वच्छ असले पाहिजेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा बुळबुळीतपणा असता कामा नये.

    - ताजे मासे ओलसर दिसतात आणि घट्ट असतात.

    - ताज्या माशांची त्वचा चमकदार, ओलसर आणि गुळगुळीत असते. माशांना खवले असले पाहिजेत आणि ते त्वचेला घट्टपणे चिकटलेले असले पाहिजेत.

    मासे खरेदी करताना..

    मासे ताजे मिळायला हवे असतील, तर मासे खरेदी करण्याचं ठिकाणही खात्रीचं पाहिजे. समुद्रातून मासे काढल्यापासून शक्य तितक्या कमी वेळात जिथे उपलब्ध होतात, तिथेच माशांची खरेदी केली पाहिजे. शक्यतो मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असलेल्या ठिकाणी मासे ताजे मिळतात. कारण तेवढ्या प्रमाणात तिथे ते उपलब्ध केले जातात. मासे जिथून खरेदी केले जातात, तिथे ते व्यवस्थित हाताळले जातात ना, याचीही खात्री करणं आवश्यक आहे. कारण मासे ताजे असले तरी ते योग्य पद्धतीने हाताळले गेले नाहीत, तर ते लवकर खराब होऊ शकतात.

    First published:
    top videos

      Tags: Fish