मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Good Fats साठी मासेच खायला हवे असं नाही, हे शाकाहारी पदार्थही आहेत फायदेशीर

Good Fats साठी मासेच खायला हवे असं नाही, हे शाकाहारी पदार्थही आहेत फायदेशीर

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक घटक आहे.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक घटक आहे.

साधारणपणे ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड (Omega 3 Acid) माशांपासून मिळतं हे आपल्याला माहिती असतं. पण, याचे काही शाकाहारी स्त्रोतही आहेत...

दिल्ली, 24 ऑगस्ट : शरीराचं काम व्यवस्थित चालण्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फॅट्सचीही अत्यंत गरज असते. कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन्स सी याचं महत्त्व आपल्याला माहिती असतं. पण, बऱ्याच वेळा ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड (Omega 3 Acid) म्हणजे नेमकं काय ? हे आपल्याला माहिती नसतं. हाडांच्या दुखण्यासारख्या (Bon pain) एखाद्या आजारासाठी डॉक्टर सुद्धा आपल्याला ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड घेण्याचा सल्ला देतात. त्यासाठी डॉक्टर एखादी सप्लीमेंट (Sapient) लिहून देतात. पण, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड नैसर्गिक स्रोतांमधूनही (Natural souses) मिळवता येऊ शकतं. मासे (Fish) हे त्याचा नैसर्गिक स्रोत आहेत. पण, मासे खाणाऱ्या व्यक्तींनी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडची कमी जाणवी शकते. त्यासाठी शाकारी पदार्थांमधूनही (Vegetarian Food) ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मिळवता येऊ शकतं. पाहूयात ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड म्हणजे काय आणि त्याचे फायदे.

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक घटक आहे. शरीरासाठी फॅट्स चांगले नसले तरी, हे फॅटी अ‍ॅसिड उपयोगी आहे. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे आवश्यक फॅट शरीर तयार करू शकत नाही. पण, फॅटी अ‍ॅसिड शरीरासाठी आवश्यक असतात. त्याचा पुरेसा पुरवठा आपल्या खाद्यपदार्थातून होत असतो. पण, याच्या कमतरतेमुळे तणाव, प्रतिकारशक्ती कमी होणं, यकृत आणि किडनी यांसारख्या अवयवांचे आजार होतात.

(आवडता पिझ्झा खाण्यापूर्वी हे वाचा; 1 त्रिकोण करतो तुमच्या आयुष्याची 8 मिनिटं कमी)

ओमेगा 3 आपल्या शरीराचे कार्य सुधारण्यासाठी आणि मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतं. त्यात 3 प्रकारचे फॅट असतात. अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड , इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड आणि डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिड असे याचे प्रकार आहेत.  त्यातील दोन अ‍ॅसिड म्हणजे इकोसॅपेन्टाइनॉइक अ‍ॅसिड आणि डोकोसॅहेइक्सानॉइक अ‍ॅसिड माशांमधून तर एक लिनोलेनिक अ‍ॅसिड डाळीमधून मिळतं.

शक्यतो मासे आणि सप्लीमेंट डायटच्या माध्यमातून ओमेगा 3 आपल्याला मिळू शकतं. ते नियमितपणे घेणं आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या कामांसाठी मदत करतं. हृदयापासून प्रजननक्षमता चांगली ठेवण्यासाठी देखील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड घ्यावं लागतं. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड नवीन पेशी तयार होण्याच्या कार्यातही मदत करतं.

('सुपर टेस्टर'ला गवसला कोरोनामुळे गमावलेला गंध; वासाची क्षमता परत मिळवण्याचा उपाय)

हृदयासाठी फायदेशीर

शरीरात ट्रायग्लिसराइड्स  कमी करण्याचं काम ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड करतं. यामुळे हार्ट अटॅकची भिती कमी होते. याशिवाय शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये गाठी होण्याचं प्रमाण नियंत्रणात येतं.

सांध्यासाठी महत्वाचं

सांध्याचा त्रास असेल तर, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड नक्की घ्यावं. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड नियमितपणे घेतल्यास सांधेदुखीचा त्रास होण्याची भीती कमी होते. संधिवात, स्नायूंच्या वेदना, सूज असे त्रास असतील तर ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड फायदेशीर आहे.

(हे 7 पदार्थ आहेत अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स पॉवर हाउस; आजारापणापासून बचावासाठी रोज घ्या)

ओमेगा 3चे शाकाहारी स्त्रोत

माशांपासून तयार केलेलं तेल, कॉर्ड लिव्हर ऑईल हा मुख्ये स्त्रोत आहे. पण, शाकाहारी माणसांसाठी आळशी, सोयाबीन तेल, मेथीच्या बिया, काळे चणे, लाल राजमा, पालक, अक्रोड आणि खवा हे ओमेगा 3चे नैसर्गिक स्त्रोत आहेत.

First published:
top videos

    Tags: Fat, Health Tips, Lifestyle