मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'सुपर टेस्टर'ला गवसला कोरोनामुळे गमावलेला 'गंध'; वासाची क्षमता परत मिळवण्याचा उपाय

'सुपर टेस्टर'ला गवसला कोरोनामुळे गमावलेला 'गंध'; वासाची क्षमता परत मिळवण्याचा उपाय

कोरोनामुळे गेलेली वासाची क्षमता परत मिळवण्याचा उपाय.

कोरोनामुळे गेलेली वासाची क्षमता परत मिळवण्याचा उपाय.

या सुपर टेस्टरने स्वतः वास घेण्याची क्षमता गमावली होती.

रोम, 24 ऑगस्ट : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (Coronavirus Infection) अनेकांनी चव (Taste) आणि वास (Smell) न येण्याच्या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. कोरोना संसर्गातून बरं झाल्यानंतरही अनेकांना आपल्या या क्षमता (Loss of smell) पूर्वीइतक्याच कार्यक्षम झाल्या नसल्याचं आढळलं आहे. त्यामुळे त्यावरच्या उपाय योजनांचा शोध घेतला जात आहे (Regain loss of smell). अशा परिस्थितीत इटलीतल्या (Italy) एका 32 वर्षीय तरुणानं या समस्येनं ग्रस्त असलेल्या असंख्य लोकांना दिलासा दिला आहे. या तरुणाचं नाव आहे मिशेल क्रिप्पा (Michele Crippa).

मिशेलला स्वतःला कोरोनाचा (Corona Virus Infection) संसर्ग झाला होता, त्यातून बरा झाल्यावर त्याला जाणवलं, की आपली वास (Smell) घेण्याची क्षमता पूर्वीसारखी नाही. यामुळे तो अतिशय अस्वस्थ झाला. कारण तो 'सुपर टेस्टर' होता. खाद्य क्षेत्रातला सल्लागार म्हणून, तसंच अन्य अनेक भूमिकाही तो निभावत होता. चवीतला अगदी बारीकसारीक फरकही त्याला कळत असे. आपली वास ओळखण्याची क्षमता पूर्वी सारखीच करण्यासाठी त्यानं संशोधन करण्यास सुरुवात केली.

हे वाचा - चिंताजनक! एकाच दिवसात 27 पेशंट, राज्यातील Delta plus रुग्णांचा आकडा शंभरी पार

न्यूयॉर्क टाइम्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार त्याने वाइनमेकर (Winemakers) आणि ट्रफल शिकाऱ्यांना (Truffle Hunters) प्रशिक्षण देणाऱ्या गंध तज्ज्ञांकडून त्यानं काही महिने स्वतः प्रशिक्षण घेतलं. वाइनमेकर (Winemakers) आणि ट्रफल शिकाऱ्यांची (Truffle Hunters) वास घेण्याची क्षमता अगदी तीव्र असते. या प्रशिक्षणातून त्यानं एक थेरपी (Therapy) विकसित केली. त्याच्या या थेरपीनं अनेकांना आपली वास घेण्याची क्षमता पूर्वीसारखीच कार्यक्षम होण्यास मदत केली आहे.

त्यामुळे सध्या इटलीत गॅस्ट्रोनोमिक क्षेत्रात मिशेल क्रिप्पाची जोरदार चर्चा आहे. सध्या क्रिप्पा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जास्तीत जास्त रुग्णांना मदत करण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण सत्र आयोजित करणं, वैयक्तिक सल्ला आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अनेक लोकांच्या आयुष्यात त्यानं गंध पसरवला आहे. त्यांचं आयुष्य त्यानं पुन्हा पूर्वीसारखं बहारदार केलं आहे.

हे वाचा - Coronavirus: लस घेतलेल्यांसाठीही डोकेदुखी ठरतोय कोरोना; जाणून घ्या यामागचं कारण

जगभरातले अनेक डॉक्टर रुग्णांना या थेरपीची शिफारस करत आहेत. भावनांवर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मेंदूच्या हायपोथॅलॅमस (Hypothalamus) या भागाच्या कार्यक्षमतेचाही वास येण्याच्या क्षमतेशी दृढ संबंध असतो, असंही संशोधकांचं म्हणणं आहे. कोरोना विषाणूमुळे परिणाम झालेले मज्जातंतूंही पुन्हा सक्रिय होण्यास यामुळे मदत होऊ शकते, असा त्यांचा विश्वास आहे.

First published:

Tags: Coronavirus, Health, Lifestyle