जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घोरणे ही कायम सामान्य समस्या नसते, या गंभीर आजाराचेही असू शकते लक्षण

घोरणे ही कायम सामान्य समस्या नसते, या गंभीर आजाराचेही असू शकते लक्षण

घोरणे ही कायम सामान्य समस्या नसते, या गंभीर आजाराचेही असू शकते लक्षण

काही लोक झोपेत जोरात घोरतात. त्यांच्या घोरण्याच्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनाही झोप येत नाही. झोप लागली तरी घोरण्याच्या आवाजाने झोप पुन्हा पुन्हा मोडते. आजकाल घोरणे ही एक सामान्य समस्या आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल : दिवसभराच्या थकव्यानंतर माणसाला शांत झोपेची गरज असते. मात्र काही लोक झोपेत जोरात घोरतात. त्यांच्या घोरण्याच्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनाही झोप येत नाही. झोप लागली तरी घोरण्याच्या आवाजाने झोप पुन्हा पुन्हा मोडते. आजकाल घोरणे ही एक सामान्य समस्या आहे. बरेच लोक झोपेत घोरतात. हे रोखण्यासाठी उपाय आवश्यक आहेत. मात्र तुम्हाला माहितीये? असं झोपेत घोरणं कायम सामान्य समस्या नसते. कधीकधी हे एखाद्या आजाराचंही लक्षण असू शकतं. तुम्ही देखील झोपेत असेच घोरत असाल तर तुमच्या घोरण्याच्या लक्षणांकडे लक्ष द्या. तुमचे घोरणे सामान्य आहे की एखाद्या आजाराचे लक्षण हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुमचे घोरणे तुम्हाला सामान्य वाटतं नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. केला तर मग जाणून घेऊया घोरण्याची कारणं काय आहेत.

Health Tips : जुनी माणसं सांगतात ‘कढईत जेवण करू नये’, परंतु काय आहे यामागचे वैज्ञानिक कारण?

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया (OSA) मुळे देखील व्यक्ती घोरू शकते. तज्ज्ञांच्या मते, एखादी व्यक्ती खूप घोरत असेल तर त्याच्या झोपेवर आणि झोपण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवले पाहिजे. यावरून खरी परिस्थिती कळू शकते.

News18लोकमत
News18लोकमत

जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये घोरणे हा एक सामान्य विकार दुबई-आधारित वृत्तपत्राशी बोलताना, UAE मधील दुबई युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील ENT विशेषज्ञ डॉ मीनू चेरियन यांनी सांगितले की, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया हा जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये एक सामान्य विकार आहे. हे झोपेच्या दरम्यान वरच्या श्वसनमार्गामध्ये श्वास घेण्यामुळे हे होते. या प्रकरणात श्वासोच्छ्वास काही काळ थांबतो आणि व्यक्ती घोरू लागते. धाप लागणे, झोपेचा त्रास, कामाचा ताण यामुळे समस्या निर्माण होतात. यासोबतच दिवसा झोपेमुळे थकवा आणि अशक्तपणा येतो. घोरण्यामुळे होऊ शकतो हृदयविकार रोज घोरणे आणि नीट झोप न येणे हे रक्तातील ऑक्सिजनचे कमी प्रमाण दर्शवते. श्वासोच्छवासा दीर्घकाळ थांबल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि हृदयाच्या इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. स्मरणशक्ती कमी होणे, सकाळी डोकेदुखी, नैराश्य या देखील ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया (OSA) मुळे उद्भवणाऱ्या काही परिस्थिती आहेत. ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा घोरण्याची इतर कारणे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियाशिवाय जास्त वजन, स्मोकिंग डिप्रेशन, गरोदरपणात सर्दी किंवा ऍलर्जी, पाठीवर झोपणे, तोंड आणि घशावर परिणाम करणारी अनुवांशिक कारणे यामुळे देखील घोरण्याची समस्या उद्भवते. तसेच फुफ्फुसात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही घोरण्याची समस्या निर्माण होते. या समस्येवर दीर्घकाळ उपचार न केल्यास मेटाबॉलिक सिंड्रोम, मधुमेह, हृदयविकार होऊ शकतात. घोरण्याच्या समस्येवर योग्य उपचार मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घोरण्याच्या लक्षणांनुसार डॉक्टर तुम्हाला उत्तम सल्ला देऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात