Home /News /lifestyle /

सवय लागली तर पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान', सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण!

सवय लागली तर पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान', सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण!

एका संशोधनात महिला या पुरुषांच्या तुलनेत अधिक धूम्रपान करतात, असं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

  दिल्ली, 3 सप्टेंबर : धुम्रपान (Smoking in women) आरोग्यासाठी (Health) हानीकारक आहे. हे सिगारेट (Cigarette) विकणारे आणि घेणारेही जाणतात. तरीदेखील सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी (Public Place) सिगारेटचे धूर धुम्रपान करणारे व्यक्ती सोडतात. धुम्रपान ही एक अशी सवय आहे की जी सुटणे फार कठीण आहे. परंतु आता एका संशोधनात महिला (Female) या पुरुषांच्या (Male) तुलनेत अधिक धुम्रपान करतात, असं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दैनिक हिंदुस्थान या हिंदी वेबसाईने दिलेल्या वृत्तानुसार फ्रांसमधील (France) बरगंडी विद्यापीठाने केलेल्या एका संशोधकांनात महिलांच्या धूम्रपानाविषयी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या संशोधकांनुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांना धुम्रपानाची जडलेली सवय सोडवणे कठीण जात आहे. साधारणतः 37 हजार 949 लोकांवर याचे संशोधन करण्यात आले आहे. यात महिलांची संख्या ही 16 हजार 432 म्हणजे 43.5 टक्के तर पुरुषांची संख्या 21 हजार 457 म्हणजे 56.5 टक्के ऐवढी होती. यामध्ये उच्च व मध्यम रक्तदाबाने ग्रस्त आणि कोलेस्ट्रॉलग्रस्त व्यक्तींचाही समावेश होता. धूम्रपानामुळे महिलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा! धुम्रपानाच्या अतिसेवनामुळे महिला लठ्ठपणाच्या शिकार होत आहे. महिलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण हे 27 टक्के आहे तर 25 टक्के पुरुषांना धुम्रपानामुळे लठ्ठपणाला सामोरे जावे लागत आहे.

  पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगळी दिसतात Pre Diabetes ची लक्षणं; शरीर देत असलेल्या या संकेतांकडे दुर्लक्ष नको

   धूम्रपान सोडण्याचा दर पुरुषांमध्ये अधिक!
  धुम्रपानाची जडलेली सवय महिलांच्या तुलनेत पुरुषांना सोपी जाते तर महिलांना ही सवय सुटत नाहीये. ईसपी कॉंग्रेस (Europian Congress Pathology) ने 2021 मध्ये याच वर्षी सादर केलेल्या ताज्या अहवालात महिलांना लठ्ठपणा असण्यामुळे आणि सिगारेटमधील काही घटकांमुळे धुम्रपान सोडणे कठीण जात आहे. सलग 28 दिवस धुम्रपान नाही केले तर व्यक्तीमधील कार्बन मोनोऑक्साईडची 10 (PPM) ने मोजली गेली. त्यामुळे पुरुषांमध्ये असणाऱ्या निकोटीनची मात्रा अधिक असूनही महिलांना सिगारेट सोडणे जड जात आहे. याचे कारण महिलांमध्ये असणारी मानसिक अस्वस्थता आणि लठ्ठपणा कारणीभूत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published:

  Tags: Health, Health Tips, Smoking, Women

  पुढील बातम्या