Home /News /lifestyle /

पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगळी दिसतात Pre Diabetes ची लक्षणं; शरीर देत असलेल्या या संकेतांकडे दुर्लक्ष नको

पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगळी दिसतात Pre Diabetes ची लक्षणं; शरीर देत असलेल्या या संकेतांकडे दुर्लक्ष नको

मधुमेह असा आजार आहे, ज्यावर कायमस्वरूपी कोणताही उपाय नाही. पण तो वेळीच लक्षात येऊन नियंत्रणात ठेवला तर त्रास होणार नाही. शरीर या आजाराचे संकेत देत असतं. त्याकडे दुर्लक्ष नको.

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर: अलीकडच्या काळात मधुमेह (Diabetes) हा सरसकटपणे आढळणारा आजार आहे. ताणतणाव, जंक फूडचे अति सेवन, व्यायामचा अभाव यामुळे मधुमेहाचा अगदी सहजपणे शरीरात शिरकाव होतो. कोणत्याही वयोगटातील लोकांना हा आजार होतो. अगदी लहान मुलांमध्येदेखील विशिष्ट प्रकारचा मधुमेह आढळतो. जागरण डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. मधुमेह असा आजार आहे, ज्यावर कायमस्वरूपी कोणताही उपाय नाही. हा आजार कधीही बरा होणारा नाही. मात्र औषधे (Medicines on diabetes) आणि जीवनशैलीतील (Lifestyle changes) बदल यांच्या मदतीनं यावर नियंत्रण ठेवता येते. आपल्या देशात दरवर्षी 10 टक्के लोकांना मधुमेह होतो. ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. वेळीच हे रोखले नाही तर मधुमेहग्रस्त लोकांची संख्या सामान्य लोकांपेक्षा जास्त होण्यास वेळ लागणार नाही. खरंतर मधुमेह होण्यापूर्वी आपलं शरीर (Body signals) त्याचे संकेत देत असते त्याला प्री-डायबेटिस (Pre Diabetes) लक्षणं म्हणतात; पण बहुतांश वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, नंतर लक्षात येतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. वेळीच या प्री-डायबेटिस लक्षणांकडे लक्ष दिलं नाही तर ‘टाइप 2’ मधुमेहाची (Type -2 Diabetes) कायमची सोबत मिळते. ही प्री-डायबेटिस लक्षणं मधुमेहापेक्षाही अधिक धोकादायक मानली जातात. कारण यामुळे मूत्रपिंड (Kidney), हृदय (Heart), स्नायूंचे (Muscles) अधिक नुकसान होते. मधुमेहापूर्वीची लक्षणं (Pre Diabetes Symptoms) : - जास्त तहान लागणे. पुरेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान लागणे. - वारंवार मूत्रविसर्जन करावे लागणे. - काम न करताही खूप थकवा येणे. - उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. - अचानक वजन वाढणे. पोटाच्या आसपास चरबी वाढणे. महिलांसाठी कंबरेचा आकार 35 इंच आणि पुरुषांसाठी 40 इंच होणे, धोकादायक ठरू शकते. बापरे! बॉडी बिल्डर बनण्याच्या नादात भयंकर अवस्था; तरुणाचा Shocking video viral - भूक वाढणे. - महिलांमध्ये पीसीओडी (PCOD) मुळे मासिक पाळी (Periods) अनियमित होते, हे मधुमेहापूर्वीचे लक्षण असू शकते. - अचानक डोळ्यांची दृष्टी (Eye Sight) कमकुवत होते. हे देखील मधुमेहापूर्वीचे लक्षण असू शकते. - कोलेस्टेरॉलचे (Cholesterol) अधिक प्रमाण हे देखील मधुमेहापूर्वीचे लक्षण असू शकते. यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर रक्त तपासणी करून (Blood Test) घ्या आणि रक्तातील साखरेची पातळी जास्त दिसत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच घेतलेली काळजी तुम्हाला अनेक घातक आजारांपासून दूर ठेवायला मदत करेल. मधुमेहासारख्या गंभीर आजारापासूनदेखील तुम्ही कायमचे दूर राहू शकता. तेव्हा प्री डायबिटीज लक्षणे वेळीच ओळखा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
First published:

Tags: Diabetes, Health

पुढील बातम्या