Home /News /lifestyle /

स्मोकिंगमुळे फुफ्फुसच नव्हे तर मेंदूही कोंडतोय; सिगारेटचा साठतोय धूर

स्मोकिंगमुळे फुफ्फुसच नव्हे तर मेंदूही कोंडतोय; सिगारेटचा साठतोय धूर

धूम्रपानामुळे (smoking) सिगारेटच्या (Cigarette) धुराचा फक्त फुफ्फुसावरच (lung) नाही तर मेंदूवरही (brain) गंभीर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे.

वॉशिंग्टन, 03 जानेवारी : धूम्रपानामुळे (Smoking) डोक्यापासून ते पायांपर्यंत संपूर्ण शरीराला परिणाम भोगावे लागतात. सिगारेट (Cigarette) आणि सिगारेटच्या धुरामध्ये अधिक घातक रासायनिक घटक असतात. यामुळे व्यक्तीच्या शरीराबरोबरच मेंदूवर देखील परिणाम होतो.  नवीन संशोधनात तर  फुफ्फुसाप्रमाणेच मेंदूत धूर साठत असल्याचं समोर आलं आहे. हा धूर म्हणजे एकप्रकारचा मेंटल फॉग ज्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अमेरिकेतील रोचेस्टर मेडिकल सेंटर विश्वविद्यालयातील (URMC) संशोधनात सिगारेटचा मेंदूवर नेमका काय परिमाम होतो हे समोर आलं. जर्नल टोबॅको इंड्स्यूड डिजीस अँड प्लस वन (Journal Tobacco Induced Disease and Plus One) या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार विद्यापीठाच्या या संशोधनामध्ये 18 हजार विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. त्याचबरोबर 8.86 लाख नागरिकांशी फोनवरून संवाद साधण्यात आला. यामध्ये जे धूम्रपान करतात त्यांना संतुलन राखण्यास अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अति धूम्रपान केल्यानं मेंदूत धूर जमा होत असून याचा कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचं देखील या संशोधनात समोर आलं. हे वाचा - किडनीचे आजार दूर करण्यासाठी खायला हवा मुळा, जाणून घ्या 5 फायदे अभ्यासानुसार 14 वर्षे वयापासून मुलांनी धूम्रपान करण्यास करण्यास सुरुवात केल्यास त्यांच्या मेंदूत एक प्रकारचा धूर साठतो. हा धूर त्यांच्या मेंदूवर दीर्घकाळ परिणाम करणारा असून यामुळं स्मृतिभ्रंश होतो, निर्णय प्रक्रियेवर याचा परिणाम होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती लवकर निर्णय घेऊ शकत नाहीत. या संशोधनाच्या सहयोगी आणि यूआरएमसी येथील क्लिनिकल अँड ट्रान्सलेशनल सायन्स संस्थेच्या प्राध्यापिका डोंगमेई ली यांनी सांगितलं, "तंबाखूचे कोणत्याही प्रकारे सेवन सेवन केल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होतो. यामध्ये तुम्ही तंबाखू खाल्ल्याने असो किंवा सिगारेटच्या रूपात असो. सर्व पद्धतींनी याचा मेंदूवर परिणाम होतो. त्याचबरोबर ई -सिगारेटमध्ये देखील तंबाखूचे प्रमाण तितकंच असल्यानं त्याचा देखील मेंदूवर जास्त प्रमाणात परिणाम होतो. हा परिणाम विशिष्ट वयोगटावर होतो असं नाही तर सर्व वयोगटावर याचा परिणाम होत असून लहानपणीच धूम्रपान केल्यानं खूप अवघड परिणाम होतो." हे वाचा - कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग; WHO ने केलं सावध "लहान वयातच सिगारेटचे व्यसन लागल्यास मेंदूवर याचा खूप परिणाम होतो. ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते, मेंदूची वाढ नीट होत नाही. स्मृतिभ्रंश आणि निर्णय प्रक्रियेवर याचा परिणाम होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती लवकर निर्णय घेऊ शकत नाहीत. याचा दीर्घ परिणाम होऊन मेंदूवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. याचबरोबर याचे भयंकर परिणाम होत असून धूम्रपान टाळण्याचा प्रयत्न करावा", असा सल्ला ली यांनी दिला.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health, Smoke, Smoking

पुढील बातम्या