मुंबई, 03 जानेवारी : मुळा (Radish) सर्व ऋतूमध्ये मिळतो परंतु हिवाळ्यात मिळणारा मुळा चांगल्या दर्जाचा आणि शरीरासाठी उपयुक्त असतो. मुळा (Radish) हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कंदमूळ आहे. अनेकजणांना मुळा अजिबात आवडत नाही. परंतु अनेकजण याचे विविध पदार्थ तयार करून किंवा आहारात याचा विविध पद्धतीने समावेश करून खात असतात. मुळ्याचा आरोग्यासाठी खूप फायदा आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मुळ्याचे सेवन केल्यास आरोग्यास नक्कीच लाभ होतो. (Radish) तज्ज्ञांच्या मते, मुळ्याचे सेवन केल्यास कोणत्याही आजारापासून बचाव करता येतो. आज आम्ही तुम्हाला मुळ्याचे काही महत्त्वाचे फायदे सांगणार आहोत.
लिव्हरची समस्या होते दूर
मुळा यकृत (Liver) आणि पोटासाठी खूप चांगला आहे आणि यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी देखील मुळा मदत करतो. मुळा रक्त शुद्ध करतो आणि विषारी पदार्थ नष्ट करतो.
रक्तदाबामध्ये फायदेशीर
ब्लड प्रेशरचा(BP) त्रास असणाऱ्यांनी कच्चा मुळा नियमित सेवन केल्यानं हा त्रास नियंत्रणात राहील. मुळ्यामध्ये पोटॅशिअमचं(Pottasium) प्रमाण जास्त असल्याने सोडियम-पोटॅशिअम या दोन घटकांना नियंत्रणात ठेवल्याने तुम्हाला ब्लडप्रेशरचा त्रास होणार नाही.
किडनी स्वस्थ राहते
मूत्रापिंडासंबंधी(Kidney) समस्या उद्भवल्यास मुळा नैसर्गिक औषधाचे काम करतो. मुळ्याचा रस घेतल्याने लघवी करताना होणारी जळजळ थांबते. मुळ्याच्या सेवनाने मूत्रविकार व मूत्रपिंडाशी निगडित संसर्गाचा धोका कमी होतो. मुळ्याला नॅचरल क्लिनझरही (Natural Cleanser) म्हटलं जातं. मुळा खाल्ल्यानं शरीरातील नको असलेला कार्बनडाय ऑक्साईड आणि बॅक्टेरिया शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते.
भूक वाढण्यासाठी मदत
मुळा आपली भूक वाढवतो आणि आपल्या पचनसंस्थेला अधिक चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करतो. रिकाम्यापोटी मुळ्याचे तुकडे सेवन करणे गॅसच्या समस्येमध्ये अधिक फायदेशीर आहे. भूक वाढवण्यासाठी मुळ्याच्या रसामध्ये आल्याचा रस टाकून प्यावा.
काविळीमध्ये फायदेशीर
कावीळ(Hepatitis) झाल्यास जेवणात मुळ्याचा अवश्य समावेश करावा. यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो. मुळाच नाही तर त्याच्या पानांची भाजी करून खाल्ल्यास कावीळ बरी होण्यास मदत होते. मधुमेहामध्ये(Diabetes) देखील मुळा खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील इन्सुलिनची (Insulin) पातळी योग्य राखण्यास मदत होऊन मधुमेह म्हणजेच डायबिटीस नियंत्रणात राहतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle