कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग; WHO ने केलं सावध

कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग; WHO ने केलं सावध

नव्या व्हायरससमोर कोरोनाव्हायरस (coronavirus) तर काहीच नसेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे.

  • Share this:

जिनिव्हा, 02 जानेवारी : सध्या कोरोनाव्हायरस (coronavirus) जगभरात थैमान घालतो आहे. त्यात कोरोनाच्या नव्या रूपाचं संकटही ओढावलं आहे. हे कमी की काय आता कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचा धोका आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंच (World health organisation) याबाबत सावध केलं आहे.

कोरोनाव्हायरस (Coronavirus) ही सर्वात भयानक महासाथ नाही. यापेक्षाही भयंकर व्हायरस जगाला आपल्या विळख्यात घेऊ शकतो, असा इशारा WHO च्या तज्ज्ञांनी दिला आहे.

WHO च्या एमर्जन्सी प्रोग्रामचे हेड डॉ. माइक रायन यांनी सांगितलं, "कोरोनाव्हायरसनं संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. जगभरात 18 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. याआधी स्पॅनिश फ्लूला (Spanish Flu) सर्वात मोठी महासाथ मानलं जात होतं. त्यावेळी एका वर्षात 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.

हे वाचा - ब्रिटनमध्ये लसीकरणाचा नवा फंडा; देत आहेत 'मिक्स अ‍ॅन्ड मॅच' Corona Vaccine

मीडियाशी बोलताना रायन यांनी सांगितलं, "ही महासाथ खूप गंभीर आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात याचा परिणाम होतो आहे पण ही महासाथ सर्वात मोठी असेल असं नाही. आता जागं होण्याची वेळ आहे. विज्ञान, लॉजिस्टिक्स, ट्रेनिंग आणि प्रशासन अधिक प्रभावी कसं करता येऊ शकतं हे आपण आता शिकतो आहे"

डॉ. रायन पुढे म्हणाले, "आपला ग्रह नाजूक आहे. आपण एका जटिल वैश्विक समाजात राहतो आणि संकटं कायम राहणार. एकत्रितरित्या कसं काम करायला हवं हे आपण या संकटातून शिकायला हवं. चांगलं काम करून ज्यांना आपण गमावलं त्यांना सन्मान द्यायला हवा"

हे वाचा - ब्रिटनमध्ये लसीकरणाचा नवा फंडा; देत आहेत 'मिक्स अ‍ॅन्ड मॅच' Corona Vaccine

"अमेरिका आणि युरोपमध्ये लस आली असली तर व्हायरस आपल्या आयुष्याचा भाग बनून रागण्याची शक्यता जास्त आहे. हा एक भयंकर व्हायरस असेल पण यामळे धोका कमी होत जाईल.  लस या व्हायरसचा खात्मा कितपत करू शकते हे पाहायला हवं. जरी लशी प्रभावी असल्या तरी व्हायरसमुळे होणार आजार पूर्णपणे नष्ट होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे ज्या लोकांना या व्हायरसचा धोका जास्त आहे, त्यांनाच लस दिली जाते आहे", असंही रायन यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: January 2, 2021, 9:30 PM IST

ताज्या बातम्या