जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / झोपा नाहीतर मृत्यू येतोय! संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

झोपा नाहीतर मृत्यू येतोय! संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

झोपा नाहीतर मृत्यू येतोय! संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

झोपेचा आणि मृत्यूचा संबंध संशोधकांनाही चक्रावून टाकणारा आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    ब्रिटन, 25 जून : मानवी शरीरासाठी पुरेशी झोप (Sleep) घेणं अत्यावश्यक असते. डॉक्टरदेखील प्रत्येकाला दररोज 6 ते 8 तास झोप घेण्याचा सल्ला देतात. दररोज पुरेशी झोप घेतल्यानं शरीर चक्र (Body Cycle) सुरळीत राहते आणि याचा परिणाम आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर व्यापक स्वरूपात होतो. जर रात्रीच्या वेळी चांगली झोप येत नसेल तर ही बाब मानसिक आणि शारीरिक आजारांना आमंत्रण देणारी ठरते आणि यामुळे लवकर मृत्यूही (Sleep cause death) ओढावू शकतो. झोप ही चांगल्या आरोग्यसाठी महत्त्वाची ठरते. पुरेशी झोप न घेणं ही बाब मधुमेह (Diabetes), हृदयविकार आणि डिम्नेशिया (Dementia) आदी गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सीएनएन हेल्थवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ज्या लोकांना रात्री चांगली झोप येत नसेल किंवा ते कमी झोप घेत असतील तर त्यांना डिम्नेशिया नावाचा आजार होण्याचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. या व्यतिरिक्त कमी वेळ झोपल्यास शरीर चक्रावरही याचा प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे समस्या निर्माण होऊन लवकर मृत्यू (Death) होऊ शकतो. हे वाचा -  स्ट्रेस फ्री जगायचंय? लवकर उठावं लागेल; ही 8 कारणं वाचाच संशोधकांनी या संशोधनासाठी 2011 ते 2018 या दरम्यान अनेक लोकांच्या झोपेच्या सवयीबाबतचा डेटा जमा केला. ज्या लोकांना अनिद्रेची समस्या आहे, त्यांना दररोज रात्री अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, असं या डेटातून स्पष्ट झालं आहे. जर्नल ऑफ स्लीप रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या या डेटाचं विश्लेषण नॅशनल हेल्थ अँड एजिंग स्टडीने केलं आहे. याबाबत हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमधील वैद्यकीय प्रशिक्षक रेबिका रॉबिन्सन यांनी सांगितलं की, या संशोधनातून जे निष्कर्ष हाती लागले आहेत, त्यानुसार दररोज रात्रीची झोप ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, हे दिसून येतं. पुरेशी झोप घेतल्यास आपली न्यूरोलॉजिकल सिस्टीम (Neurological System) योग्य पद्धतीने कार्यरत राहते आणि अकाली मृत्यू होण्याची शक्यता कमी होते. जगभरात कमी झोप घेतल्याने आणि डिम्नेशियामुळे होणारा लवकर मृत्यू हा दुवा तज्ज्ञांना खरोखरच चिंतेत टाकणारा आहे. हे वाचा -  केवळ अतिखाण्यानेच नव्हे तर जास्त पाणी पिण्याने आणि कमी खाण्यानेही वाढतं वजन याबाबत वर्ल्ड स्लिप सोसायटीने सांगितलं की, कमी झोप घेणं हे जगभरातील 45 टक्के लोकांसाठी खरोखरच धोकादायक आहे. 5 ते 7 कोटी अमेरिकी नागरिक स्लीप डिसॉर्डर, स्लीप एन्पिया, इन्सोमेनिया, रेस्टलेस लेग सिंड्रोमसारख्या आजारांनी ग्रस्त असल्याचं अहवालातून स्पष्ट होतं. सीडीएसने (CDS) याला सार्वत्रिक आरोग्य समस्या म्हणून घोषित केलं आहे. कारण कमी झोप घेण्याचा समस्येचा थेट संबंध मधुमेह, स्ट्रोक, कार्डियोव्हस्क्युलर आजार तसंच डिम्नेशियाशी आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात