मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अजब! तीन वर्षं गर्भवती राहिल्यानंतर महिलेनं दिला बकरीला जन्म, काय आहे प्रकरण?

अजब! तीन वर्षं गर्भवती राहिल्यानंतर महिलेनं दिला बकरीला जन्म, काय आहे प्रकरण?

नायजेरिया (Nigeria) या देशातून एक अजब बातमी समोर आली होती. येथील एका महिलेनं बकरीला जन्म (Woman gave birth to Goat) दिल्याची बातमी अनेक माध्यमांतून फिरते आहे. काय आहे हे प्रकरण?

  • Published by:  News18 Desk

सोशल मीडिया व्हायरल, 01 मार्च: जगात कधी काय घडेल काही सांगता येतं नाही. काही महिन्यांपूर्वी नायजेरिया (Nigeria) या देशातून एक अजब बातमी समोर आली होती. या बातमीमुळे डॉक्टरही चक्रावले असल्याचं सांगतात. कारण नायजेरियातील एका महिलेनं एका बकरीला जन्म (Woman gave birth to Goat) दिला, अशी बातमी सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फिरते आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला तीन वर्ष गर्भवती (pregnant for three years) राहिली होती. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांना विश्वास बसला नाही.

एखाद्या महिलेनं बकरीला जन्म देणं, ही नायजेरियातील पहिलीचं घटना नाही. या अगोदरही महिलांच्या गरोदरपणाविषयीच्या विविध प्रकारच्या धक्कादायक बातम्या समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर सायमन चुकबू नावाच्या व्यक्तीने, संबंधित महिलेनं बकरीला जन्म दिल्याची बातमी पोस्ट केली. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

त्याने आपल्या पोस्टसोबत काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, संबंधित महिला गेल्या तीन वर्षांपासून गर्भवती होती. तिने नुकत्याच एका बकरीच्या पिल्लाला जन्म दिला आहे. या घटनेची माहिती वाचून अनेकांना  धक्का बसला. या बातमीनंतर नायजेरियातील अनेक लोकांनी महिलेच्या घरी जावून बकरीच्या पिल्लाला पाहण्यासाठी गर्दी केली.

खरं तर ही बातमी खरी आहे की अफवा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या बातमीचा स्रोत तपासला असता Mirror ने तीन वर्षांपूर्वी दिलेली बातमी समोर आली. त्यांनी एका VIDEO सह ही बातमी दिली होती. आता पुन्हा तीच बातमी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून अजब बातमी म्हणून फिरत आहे.

First published:

Tags: Viral